एबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता महामारीचे धडे!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

एबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता महामारीचे धडे!

एबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता महामारीचे धडे!

आत्तापर्यंत अनेक साथीचे आजार उद्भवले, त्याचबरोबर त्यांच्यावर नियंत्रण मिळवताना प्रशासनाची कशा पध्दतीने दमछाक झाली याचा अनुभव आपण घेतला. तसेच बातम्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि ऐकले सुध्दा आहे. पण नेमकं साथीच्या आजारांना कसं सामोरे गेलं पाहिजे, या विषयाचं शिक्षण आता एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. याच्या आगोदर यांचं शिक्षण दिलं जात नव्हतं.

ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं आहे, आता त्यांना साथीच्या आजाराचं शिक्षण सुध्दा घ्यावं लागणार आहे. कारण यंदाच्या वैद्यकीय शिक्षणात संसर्गाचा विषय वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक, कायदेशीर आणि आजारांचा  हाहाकार कशा  पध्दतीने हाताळायला पाहिजे हे सर्व त्याच्यात असेल. असा विद्यार्थी घडवण्यासाठी, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अर्थात भारतीय वैद्यकीय परिषदेने महामारीचे व्यवस्थापन हा विषय ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा अभ्यासक्रम देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात शिकवला जाणार आहे, त्याचबरोबर कोरोनासारखं संकट आल्यानंतर त्याच्या विरोधात लढण्यात विद्यार्थ्यांना सक्षम करणार आहे. कारण सध्याच्या काळात असलेल्या डॉक्टरांवरती ताण असल्याचे दिसते आहे. तसेच सध्याच्या महामारीच्या काळात कोणत्याही डॉक्टरला काय करावे हे सुचन नाही. कारण आगोदरच्या अभ्यासक्रमात त्या पध्दतीचं सखोल ज्ञान नव्हतं.

स्पॅनिश फ्लू, प्लेग, सार्स, स्वाईन फ्लू, निपा व्हायरस, माकड ताप, जपानी मेंदू ज्वर, बर्ड फ्लू असे अनेक साथीचे आजार केव्हाही डोकेवरती काढतात. हे सर्व बघूनच अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण घेत असताना साडे चारवर्षाच्या कालावधीत हे सर्व शिकावं लागणार आहे.

अभ्यासक्रमामध्ये पीपीई किट, टेस्टिंगस, व्यवस्थापन, विलगीकरण, अलगीकरण, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, टामधून संशोधन, चिकित्सालयीन चाचण्या, नैतिक शास्त्र, टेलिमेडिसिन, औषधशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जनऔषध वैद्यकशास्त्र, जीवरसायन शास्त्र, औषधवैद्यक शास्त्र, श्वसनविकार हे विषय शिकवलं जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांला हे शिकावं लागणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News