आमिर खान दिसणार ‘फॉरेस्ट गम्प’च्या रिमेकमध्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019

आगळेवेगळे चित्रपट प्रेक्षकांना देण्यास प्रसिद्ध असलेला मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान सध्या ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. 

मुंबई : आगळेवेगळे चित्रपट प्रेक्षकांना देण्यास प्रसिद्ध असलेला मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान सध्या ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तो तब्बल २० किलो वजन कमी करणार असल्याची चर्चा आहे. \

यासाठी त्याने डाएटलाही सुरुवात केली आहे. घरातील पौष्टिक अन्न आणि प्रोटीन डाएट आमिरने सुरू केले आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलीवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अतुल कुलकर्णी लिखित या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या ऑक्‍टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News