आईसाठी आमीर खानने चाहत्यांना केली 'ही' विनंती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

आमिर खानच्या आईची कोरोना चाचणी बाकी असून तिला चाचणीसाठी घेऊन जाणार असल्याचे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या सहकाऱ्यांमधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमिरने फेसबुकवर पोस्ट लिहीत याची माहिती दिली. या कर्मचाऱ्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचसोबत इतरही कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होऊन बाकी सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आमिर खानच्या आईची कोरोना चाचणी बाकी असून तिला चाचणीसाठी घेऊन जाणार असल्याचे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याचसोबत तिचा रिपोर्ट निगेटिव्ह यावा यासाठी प्रार्थना करण्याची विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.

आमिर खान त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, "माझ्या काही कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले आहे. महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज केल्याबद्दल आणि कोरोनाबाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो.

उरलेल्या कर्मचाऱ्यांची आणि माझी चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे आणि तिथल्या डॉक्‍टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. कोरोना चाचणी करण्यात त्यांनी खूप मदत केली.' निर्माते बोनी कपूर आणि करण जोहर यांच्या घरातील नोकरांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यांनी कोरोनावर मात केली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News