शेतकऱ्याच्या मुलाला बारावीत ९८.२ टक्के; अमेरिकेत मिळाली शिक्षणाची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 July 2020

गावापासून ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. गावात शिक्षणाची साधने नव्हती, रात्री अभ्यास करण्यासाठी लाईन उपलब्ध राहत नव्हती, वारंवार वीज लपंडाव खेळत होती, अशा कठीन परिस्थितीवर मात करुन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत अनुरागने नेत्रदीप यश संपादन केले.

मनात जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतेही स्वप्न पुर्ण करता येते. सामान्य शेतकरी कुटुबांत जन्मलेल्या अनुराग तिवारी या विद्यार्थ्यांने हे सिद्ध करुन दाखवले. प्रतिकुल परिस्थिती बारावीच्या परीक्षेत ९८.२ टक्के मिळून आपल्या कुटुंबाचे नाव रोशन केले. त्याचबरोबर अमेरिकेतील सुप्रसिद्ध कॉर्नेल विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली. त्याचे पुढील शिक्षण अमेरिकेत पुर्ण होणार आहे. शेतकऱ्याच्या मुलाने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

गावापासून ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. गावात शिक्षणाची साधने नव्हती, रात्री अभ्यास करण्यासाठी लाईन उपलब्ध राहत नव्हती, वारंवार वीज लपंडाव खेळत होती, अशा कठीन परिस्थितीवर मात करुन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत अनुरागने नेत्रदीप यश संपादन केले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात सरसन एक छोटस गाव आहे. सरसन येथील शेतकरी कुटुबांत जन्मलेल्या अनुराग तिवारी या १८ वर्षीय तरुणाची निवड सातासमुद्रापार झाली. अमेरिकेतील न्युयॉर्क शहरात असलेल्या कॉर्नेल विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी अनुरागला मिळाली. शिक्षणाकरित १०० टक्के शिक्षणवृ्त्ती विद्यापीठाद्वारे देण्यात आली. १ सप्टेंबरपासून कॉर्नेल विद्यापीठाचे अभ्यासवर्ग सुरु होणार आहे. मात्र कोरोनामुळे विमानसेवा बंद आहे, त्यामुळे इंटरनेटद्वारे अनुराग ऑनलाईन वर्गाला उपस्थित  राहणार आहे. अर्थशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन पदवी प्राप्त करणार आहे. विदेशात पदव्युत्तर पदवी घेण्याची इच्छा आहे. त्यानंतर काही वेळ विदेशान नोकरी करुन भारतात भरतणार आहे. भारतातील शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा अनुरादगे व्यक्त केली.   

आई वडील यांच्या पासून मिळाली प्रेरणा

सहावी वर्गात असाताना अनुरागने विद्याज्ञान प्रवेश परीक्षा पास केली. ग्रामीण विद्यार्थ्यांना नेत्रृत्वगुण विकसीत करण्यासाठी विद्याज्ञान संस्था मदत करते. त्याचबरोबर प्रतिकुल परिस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते. अनुरागचे आई- वडील  शेतकरी आहेत, वडील शेतात काम करतात तर आई गृहिनी आहे. आई- वडीलांचे कष्ट पाहून अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. आई वडीलांचे कष्ठ कमी करायचे असतील तर आपण शिकल पाहिजे, भविष्यात नोकरी करुन कुटुंबासह देशाचा विकास केला पाहिजे असे अनुरागला वाटते. 

सोलोसटिक एडमिशन टेस्ट

अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी सोलोसटिक एडमिशन टेस्ट (SAT) द्यावी लागते, ही टेस्ट चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर विद्यापीठात प्रवेश मिळतो. त्यासोबत शिष्यवृत्ती दिली जाते. अनुरागला सोलोसटिक एडमिशन टेस्टमध्ये १६०० पैकी १३७० मार्क मिळाले होते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ही प्रवेश परीक्षा संपन्न झाली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News