मराठी शाळेच्या मुलाने मिळवले 94.40 टक्के

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • रिक्षाचालकाच्या मुलाची कमाल 
  • कांदिवलीतील इराणी वाडीतील झोपडीत राहणा-या श्रीवर्धन भोसले या मुलाने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावीत 94.40 टक्के मिळवले

मुंबई - कांदिवलीतील इराणी वाडीतील झोपडीत राहणा-या श्रीवर्धन भोसले या मुलाने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावीत 94.40 टक्के मिळवले आहे.  वडिलांचा रिक्षाचालकाच्या व्यवयावर संसाराचा गाढा ओढला जात असला जात असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची होती. परंतु माझ्या वडिलांना मला चांगल्या टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण होताना पाहायचे होते. म्हणून शाळा, क्‍लासेस सांभाळत जागरणं करत दहावीत घवघवीत यश संपादन करता आल्याची प्रतिक्रिया श्रीवर्धन प्रताप भोसले यांनी दिली. 

श्रीवर्धनने कांदिवलीतील हिल्डा कॅस्टेलिनो मराठी शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा मोठा भाऊदेखील याच शाळेतून शिकला. मोठा भाऊ हर्षवर्धन बारावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. मात्र नीटच्या परिक्षेत अपेक्षित गुण कमावता न आल्याने त्याचे डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने घरात सर्वांचा चेहरा उतरला होता. त्यामुळे माझ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते

. वडिलांच्या व्यवसायातून घराचा रोजचा खर्च भागताना अडचणी होता. परंतु वडिलांनी क्‍लासेसला मला प्रवेश मिळवून दिला. आम्हां दोन्ही भावंडांना भविष्यात चांगल्या पदावर नोकरी करताना त्यांना पाहायचे आहे. म्हणून शाळा, क्‍लासेस सांभाळत सहा ते सात तास मी अभ्यास करायचो. घर रस्त्याच्या बाजूलाच असल्याने सतत वाहनांच्या वर्दळीमुळे अभ्यासातील एकाग्रता जपताना अडचणी यायच्या.

परंतु वडिलांचा चेहरा दिसला की अभ्यासात स्वतःला झोकून द्यायचो, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन याने दिली. मला भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे. विज्ञानात प्रवेश घेऊन बारावीनंतर मी आयआयटीतून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंचा अभ्यास पूर्ण करणार, असेही श्रीवर्धन भोसले याने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News