आईच्या परिश्रमाचे चीज; दहावीच्या निकालात 92 टक्के

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • मुलांच्या डोक्‍यावरुन लहानपणीच वडीलांचे छत्र हरपले.
  • अवघ्या दुसऱ्या वर्गात असताना, मेंदुच्या पक्षाघाताने वडीलांचा मृत्यू झाला. 
  • आईला झालेले दु:ख आणि तीच्या वेदना दूर करण्यासाठी नाव कमावयाचे असल्याचे तो बोलतो.

नागपूर: मुलांच्या डोक्‍यावरुन लहानपणीच वडीलांचे छत्र हरपले. मुलांची संपूर्ण जबाबदारी आई ज्योती देशमुख यांच्या खांद्यावर येऊन पडली. ती जबाबदारी पेलण्यासाठी आईने शिवणकाम सुरू केली. दिवसरात्र कष्ठ आणि हालअपेष्टा सोसून ज्योती देशमुख यांनी अंशुलला कुठलाही धक्का लागू न देता, त्याच्या सर्वच गरजा पूर्ण केल्यात. अंशुलनेही दहावीच्या निकालात 92 टक्के गुण मिळवित आपल्या आईच्या परिश्रमाचे चीज केले आहे. 

अंशुल देशमुख हा अवघ्या दुसऱ्या वर्गात असताना, मेंदुच्या पक्षाघाताने वडीलांचा मृत्यू झाला. त्यावेळी मोठी बहिण सातव्या वर्गात होती. दोन मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी पेलायची कशी हाच प्रश्‍न माऊलीच्या मनाला भेडसावत होता. मात्र, परिस्थितीशी लढण्याचा मनाशी दृढ निर्णय घेत, त्यांनी शिवणकामास सुरुवात केली. बऱ्याच आर्थिक अडचणीवर मात करीत, त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. प्रथम मुलीचे दहावी, बारावीचे आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मुलीप्रमाणेच अंशुलनेही दहावीच्या परीक्षेत 92 टक्‍के गुण मिळवित आईचे परिश्रम सार्थ ठरविले. 

आता अंशुलने आयआयटीमध्ये जाऊन अभियांत्रिकी आणि त्यानंतर वैज्ञानिक होण्याचा ध्यास मनोमनी जोपासला आहे. आईला झालेले दु:ख आणि तीच्या वेदना दूर करण्यासाठी नाव कमावयाचे असल्याचे तो बोलतो. मात्र, समोरच्या शिक्षणासाठी लागणारा अधिकाचा पैसा आणायचा कुठून हा प्रश्‍न वारंवार ज्योती देशमुख यांना भेडसावतो आहे.. मात्र, याही परिस्थितीने खचून न जाता, हे दिवसही संपतील असा आशावाद त्यांच्या मनात कायम आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News