करीरोड येथील रात्रशाळेचा निकाल ९० टक्के

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीरोड येथील सहकार नाईट हाइस्कूलचा दहावीचा निकाल ९० टक्के लागला आहे.
  • त्यामुळे दिवसा काम आणि रात्री शाळा असा दिनक्रम असणाऱ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

मुंबादेवी :- गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीरोड येथील सहकार नाईट हाइस्कूलचा दहावीचा निकाल ९० टक्के लागला आहे. त्यामुळे दिवसा काम आणि रात्री शाळा असा दिनक्रम असणाऱ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

विशेष बाब म्हणजे रात्रशाळेतदेखील मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. शाळेत रेश्‍मा गावडे (७८.४० टक्के), माधुरी भोसले (६७.६०), शिवानी रामाने (६४.२०), कोमल कांबळे (६४.००), शोभा शेळके (६०.८०), तसेच, साहिल सोनवणे, दीपक कानडे, हर्ष पालांडे, स्वाती साळवे हे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सहकार शिक्षण संस्थेच्या गजानन रेवडेकर (कार्याध्यक्ष), जगदीश नलावडे (अध्यक्ष) आणि मुख्याध्यापक राजेश तांदळे यांनी अभिनंदन केले. शाळेला केलेल्या मदतीबद्दल मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर यांचे शाळेने विशेष आभार मानले.

मुंबई

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News