स्थानिक कामगारांना 80 टक्के प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 June 2020
  • मनसेच्या शिष्टमंडळाची राज्यापालांकडे मागणी

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आपापल्या राज्यात परत गेलेले मजूर राज्यात परत येत असतील, तर "आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये' नोंदणी व वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा. तसेच राज्यातील रोजगारांमध्ये 80 टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आज मनसेच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन केली.

रोजगारासाठी कामगार मिळत नसल्याची तक्रार कारखानदारांकडून येत असल्याने परराज्यात गेलेल्या कामगारांनी परत यावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांना दिलेल्या निवेदनात परराज्यांतून परतणाऱ्या कामगारांची नोंदणी सक्तीची करावी, ही प्रमुख मागणी मनसेने केली. मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, आमदार राजू पाटील यांचा शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदनही राज्यपालांना दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News