'या' रोगामुळे 8 वर्षाच्या मुलीचा वृध्द होऊन मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 February 2020
  • आश्चर्यकारक आहे, जेव्हा आपण ऐकतो की, मुलगी केवळ 8 वर्षांची आहे आणि ती म्हातारी आहे.
  • तिचे वय पूर्ण झाली आणि तिचा मृत्यू झाला.

आश्चर्यकारक आहे, जेव्हा आपण ऐकतो की, मुलगी केवळ 8 वर्षांची आहे आणि ती म्हातारी आहे. तिचे वय पूर्ण झाली आणि तिचा मृत्यू झाला. युक्रेनमध्ये ही घटना घडली आहे. येथे, 8 वर्षाची मुलगी बालपणातच वृध्द झाली आणि तिचे निधन झाले.  

या मुलीच नाव अन्ना साकीडोन आहे. या गोड मुलीचे खरे वय केवळ 8 वर्ष होते, परंतु तिला एका आजाराने ग्रासले ज्याने तिला वृद्ध केले. इतके वृध्द केले की, तिचे वय पूर्ण झाले आहे. या आजाराने मरणारी अन्ना सायकिडोन जगातील सर्वात तरुण मुलगी आहे.  

या रोगाचे नाव प्रोजेरिया आहे. या दुर्मिळ अनुवांशिक रोगाने, शरीराचे सर्व अवयव हळूहळू वृद्ध होऊ लागतात. शेवटी सर्व अवयव काम करणे थांबवतात. पा या बॉलीवूड चित्रपटात हा आजार चांगला दाखवला गेला. त्यात अमिताभ बच्चन यांनी प्रोजेरिया ग्रस्त मुलाची भूमिका केली होती.

सध्या जगातील केवळ 160 लोक प्रोजेरियामुळे आजारी आहेत. अन्ना सायकिडोनचे वयाच्या 8 व्या वर्षी निधन झाले आहे. परंतु प्रोजेरियामुळे ती जवळजवळ 80 वर्षांची झाली होती. तिचे वजन 7 किलो झाले होते. शेवटी, त्याच्या सर्व अवयवांनी काम करणे थांबवले.

अन्ना साकीडोनची आई इवाना म्हणाली की, मी माझी मुलगी गमावली आहे. मी तिच्यासाठी काहीही करण्यास तयार होती. पण मी तिला वाचवू शकली नाही.

अन्ना सायकिडोनवर उपचार करणारी डॉक्टर नादेहदा कैटामैन म्हणाली की, अन्ना सायकिडोन एक चांगली मुलगी होती. लहानपणापासूनच तिच्यावर वोलीन रीजनल चिल्ड्रेन्स मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये उपचार सुरू होते. आम्ही तिला वाचवू शकलो नाही.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News