मुंबईत 79 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या 775

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 April 2020

कोरोनाच्या 79 नव्या रुग्णांपैकी बहुतेक जण मध्यमवर्गीय व झोपडपट्टी परिसरातील असल्याचे समजते.

मुंबई: मुंबईत गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 79 नवे रुग्ण सापडल्यामुळे बाधितांची संख्या 775 वर गेली आहे. गुरुवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे बळींचा आकडा 54 झाला आहे. सहा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आतापर्यंत 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाच्या 79 नव्या रुग्णांपैकी बहुतेक जण मध्यमवर्गीय व झोपडपट्टी परिसरातील असल्याचे समजते. मृतांपैकी अनेक जणांना दीर्घकालीन आजार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या पथकांनी आतापर्यंत 15 लाख व्यक्तींचे सर्वेक्षण केले. अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेऊन चाचणी करण्यात आली. पाच पथकांनी घरोघरी जाऊन कोरोना चाचणीसाठी 15 हजार नमुने गोळा केले.

प्रतिबंधित क्षेत्रात कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आठवडाभरात 40 विशेष दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. या दवाखान्यांत 1588 जणांची तपासणी करण्यात आली आणि त्यांच्यापैकी 442 संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News