अन्य आजारांच्या रुग्णांसाठी 7 हजार 500 खाटांची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 15 May 2020

मुख्य रुग्णालये उपलब्ध खाटा

लो. टिळक 1278
केईएम 1711
कूपर 550

मुंबई : कोव्हिडव्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांसाठी महापालिकेने 7500 खाटांची व्यवस्था केली आहे. महापालिका रुग्णालयांसह 1416 खासगी नर्सिंग होम आणि 187 दवाखान्यांत या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. महापालिकेच्या 27 प्रसूतिगृहांत 899 खाटा आहेत, तर 17 उपनगरी रुग्णालयांत 3076 खाटा कोव्हिडव्यतिरिक्त अन्य उपचारांसाठी राखीव ठेवण्यात येतील. 

अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून महापालिकेने हे नियोजन केले आहे. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचारांची सुविधा असलेली महापालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरी रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने व खासगी नर्सिंग होम आदींची विभागनिहाय यादी portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महापालिकेच्या 1816 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मुख्य रुग्णालये उपलब्ध खाटा
लो. टिळक 1278
केईएम 1711
कूपर 550

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News