सरकारी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात 7.5 टक्के आरक्षण; विधानसभेत विधेयक मंजूर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020

सरकारी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना या पुढे वैद्यकीय प्रवेशात 7.5 टक्के आरक्षण मिळणार आहे. ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनही अर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 

अपूऱ्या सोयी सुविधामुळे ग्रामीन भागातली विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचे पर्याय नसतात, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सरकारी शाळेचा पर्याय स्वीकारावा लागतो. सीबीएसई, आयसीएस आणि खासजी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेक सरकारी शाळेलीत विद्यार्थ्यांना कमी सुविधा मिळतात, त्यामुळे वैद्यकीय स्पर्धेत सरकारी शाळेतील विद्यार्थी मागे राहतात, अशा विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात 7.5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला. 7.5 टक्के आरक्षणाचे बिल मंगळवारी विधनासभेत मांडण्यात आले. बिलावर सविस्तर चर्चा करुन सर्वानुमते मजूर करण्यात आले. राज्यापालांच्या स्वाक्षरी नंतर बिलाचे रुपांतर कायद्यात होणार आहे. त्यामुळे सरकारी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना या पुढे वैद्याकीय प्रवेशात 7.5 टक्के आरक्षण मिळणार आहे. ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनही अर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जणारी नॅशनल इलिजिबिलिटी कम इन्ट्रन्स टेस्ट (NEET) 13 सप्टेंबरला संपन्न झाली, देशातली 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली, त्यातून ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्ती अशा परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थी सरकारला केली होती, मात्र नॅशनल टेस्टींग एजन्सीने ही मागमी अमान्य करुन परीक्षा आयोजिक केली, त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला, आता विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. 

नीट परीक्षा सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित असते. त्यामुळे राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम आणि नीट अभ्यासक्रम यांच्यात मोठी तफावर आहे, तामिळणाडू बोर्डाचा निकाल लागल्यानंतर एका महिन्यात आत नीट परीक्षा घेतली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, विद्यार्थी नैराश्येच्या छायेत जातात आणि आत्महत्या करण्याचा विचार करतात, त्यामुळे नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची आवश्यकता आहे असा मुद्दा डीएमकेचे खासदार टी. आर. बालू यांनी लोकसभेत उपस्थित केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News