क्रिकेटचे हे ७ नियम वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लागू होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीद्वारे नियमात बदल
  • वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लागू होणार हे नियम

 क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगतोय.  वर्ल्ड कपच्याआधी भारतीय टीमच्या जर्सीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 'मेन इन ब्लू' अशी ओळख असलेली भारतीय टीम भविष्यात आता 'मेन इन ऑरेंज' नावानं ओळखली जाईल. क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीद्वारे काही नियम बदलण्यात आले आहे. वनडे क्रिकेटसाठी हे नियम पूर्वीच लागू केले असून हे नवीन नियम पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये लागू होत आहेत .

विश्वचषकासाठी लागू होणारे नवे नियम

1. हेल्मेटला बॉल लागून झेल टिपल्यास बाद

या नियमा नुसार, जर फलंदाजाने मारलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून उडाला आणि तो दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेलल्यास फलंदाजाला बाद ठरवलं जाईल.. मात्र, हँडल द बॉल च्या परिस्थितीत फलंदाजाला बाद दिले जाणार नाही. 

 

२. पंचासोबत हुज्जत घालणारे खेळाडू मैदानाबाहेर

कित्येकदा भर मैदानात अनेक खेळाडू पंचांचा नियम न पटल्याने त्यांच्याशी भांडण करतात. पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना आयसीसीच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’ च्या १.३  नियमाद्वारे दोषी ठरवून पंच मॅचदरम्यान बाहेर काढू शकतात.या नवीन नियमानुसार पंचाच्या हातात आणखी अधिकार आले आहेत.

 

3. रिव्ह्यूची संख्या कमी होणार नाही

बऱ्याचदा मॅचदरम्यान दोन्ही संघ डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम अर्थात डीआरएस वापर करत रिव्ह्यू मागतात. यावेळी कधीकधी पंचानी दिलेला निर्णय अंतिम ठेवला जातो. यामुळे संघांकडे असलेला रिव्ह्यू वाया जातो. मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान संघाने डीआरएसचा वापर करत रिव्ह्यू मागितला, त्यावेळीही पंचांचा रिव्ह्यू कायम राहिल्यास संघांकडच्या रिव्ह्यूची संख्या कमी होणार नाही.

4. चेंडू दोनदा बाऊन्स झाल्यास ‘नो बॉल’

कित्येकदा मॅचदरम्यान गोलंदाजाने चेंडू फेकल्यानंतर चेंडू दोनदा बाऊन्स होतो. मात्र यंदा विश्वचषकादरम्यान चेंडू दोनदा बाऊन्स होऊन फलंदाजाकडे गेल्यास तो नो बॉल देण्यात येणार आहे. आयसीसीने याबाबतचा नवीन नियम लागू केला आहे.

5. क्रिजवरील रेषेवर बॅट असल्यास फलंदाज आऊट

बाद होण्याच्या भितीने अनेकदा धाव घेताना खेळाडू डाय मारुन धावपट्टीच्या रेषेवर बॅट ठेवतात. बॅट रेषेवर असल्याने खेळाडू नाबाद ठरतो. मात्र आयसीसीच्या नव्या नियमावलीनुसार, खेळाडूची बॅट ऑन द लाईनवर असेल तर त्याला बाद ठरवलं जाणार आहे. मात्र जर बॅट किंवा फलंदाज ऑन द लाईनच्या आत असेल तर फलंदाज नाबाद असणार आहे.

6. बॅटचे मापही निश्चित

कित्येकदा फलंदाजाच्या बॅटचे माप नियमानुसार नसल्याचा दावा केला जातो. मात्र यंदा विश्वचषकादरम्यान बॅटची लांबी आणि जाडी किती असावी याचे माप देण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, बॅटची रुंदी 108 मि.मी, जाडी 67 मि.मी असावी असे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय बॅटची कडा 40 मि.मीपेक्षा जास्त नसावी असेही फलंदाजांना सांगण्यात आलं आहे. तसेच बॅटच्या मापाबाबत पंचांना संशय आल्यास, पंच लगेचच माप तपासू शकतात.

7. बाय आणि लेग बायच्या धावा वेगवेगळ्या असणार

गोलंदाजाने नो बॉल टाकल्यास फलंदाजाला बाय किंवा लेग बायद्वारे अतिरिक्त धावांमध्ये धरल्या जातात. मात्र विश्वचषकादरम्यान नो बॉलद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त धावा या वेगवेगळ्या ग्राह्य धरल्या जाणार आहे. म्हणजेच गोलंदाजाने नो बॉल टाकल्यानंतरच्या बाय किंवा लेग बाय अशा धावांची विभागणी करण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News