66th National Film Awards अभिनय क्षेत्रातील कलाकारांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

प्रमुख पुरस्कार

सर्वोत्तम चित्रपट : इल्लारू (गुजराती), सर्वोत्तम मराठी चित्रपट : भोंगा, सर्वोत्तम हिंदी चित्रपट : अंदाधुंद, सर्वोत्तम लोकप्रिय सिनेमा : बधाई हो, सर्वोत्तम अभिनेता : आयुष्मान खुराणा (अंदाधुंद), विकी कौशल (उरी), सर्वोत्तम अभिनेत्री : किर्ती सुरेश (महन्ती), सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता : शिवनंद किरकरे (चुंबक), सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सिक्री (बधाई हो), सर्वोत्तम संगीत दिग्दर्शन : संजल लीला भन्साळी (पद्मावत), सर्वोत्तम गायक : अरजित सिंग, सर्वोत्तम गायिका : मधू मालिनी, सर्वोत्तम बालकलाकार : श्रीनिवास पोफळे (नाळ)

प्रतिष्ठेच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्ली :  प्रतिष्ठेच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते.

‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ‘पाणी’, ‘नाळ’, ‘चुंबक’, ‘तेंडल्या’, ‘खरवस’ आणि ‘आई शप्पथ’ या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटांसाठी एकूण 10 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

1. ‘नाळ’ : चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा तर प्रसिध्द अभिनेते स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम बालकलाकार म्हणून त्याला नाळ या चित्रपटासाठी गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असताना त्याने स्टेजवर पाय ठेवण्याआधी पायऱ्यांना नमस्कार केला तर पुरस्कार प्रदान करणाऱ्या उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याही तो पाया पडला.
2. ‘अंधाधून’ : या चित्रपटासाठी अभिनेता आयुष्मान खुरानाला सर्वोत्तम अभिनेता म्हणून पुस्कार प्राप्त झाला. अंधाधून हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2018 ला प्रदर्शित झाला. चित्रपटातील आयुष्मानच्या भूमिकेची सर्वच स्थारातून स्तुती करण्यात आली. 
3. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशलला विभागून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची दखल बॉलिवूडने घेत या घटनेवरील आधारित हा चित्रपट तयार केला. या चित्रपटाला प्रचंड प्रेम आणि विकी कौशलला लोकांनी डोक्यावर उलचुन घेतले.
4. 'महानटी' : या तेलुगु चित्रपटातील भूमिकेसाठी किर्थी सुरेश या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेलुगु आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं. 
5. ‘पाणी’ : आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित ‘पाणी’ या चित्रपटाला पर्यावरणावरील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
6. ‘भोंगा’ : ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा बहुमान प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मंदार- नलिनी प्रोडक्शनचे शिवाजी लोटन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 
7. 'उरी' : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून आदित्य धर यांना पुरस्कार प्रधान झाला. याच चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशलला विभागून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
8. 'पॅडमॅन' : सामाजिक मुद्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' ने पुरस्कार मिळवला आहे. आर. बाल्की दिग्दर्शित आणि अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला 'पॅडमॅन' हा चित्रपट मासिक पाळी आणि त्या काळात घ्यायची स्वच्छतेची काळजी या विषयावर भाष्य करतो व त्यासाठी अरुणाचलम मुरुगन यांची सत्यकथा सांगतो. 
9. 'बधाई हो' : हिंदी चित्रपटातील सर्वोत्तम फिचर फिल्मचा मान 'बधाई हो' ने पटकावला. दिग्दर्शक अमित शर्माला हा पुरस्कार देण्यात आला. 
10. 'अंधाधून' : सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा मान 'अंधाधून' या चित्रपटाने पटकावला. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला. चित्रपटाने बॉक्सऑफिसवरही चांगलीच कमाल केली. 

अमिताभ बच्चन यांना 29 डिंसेबरला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ भारतीय चित्रपटसृष्टीवर गेल्या 50 वर्षांपासून कसदार अभिनयाने गारूड घालणारे महानायक अमिताभ बच्चन यांना येत्या 29 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याचे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या समारंभात सांगितले.

महानायक अमिताभ बच्चन यांना ‘50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News