आठ महिन्यात तरूणीने केली ६ लग्न; प्रत्येक लग्नाचे मिळाले इतके पैसे
लग्न झाल्यानंतर पत्नीने सासरच्या लोकांकडे माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. नवीन लग्न झालेल्या पत्नीसोबत पतीही गाडीतून निघाला. गाडीतून जात असताना आपली फसवणूक झाल्याची नवरदेवाच्या लक्षात आले होते. परंतु माहेरी घेऊन जायला आलेल्या चार व्यक्तींनी पतीच्या हत्येचा प्लॅन केला होता. त्याप्रमाणे पतीची हत्या केली आणि हे प्रकरण उजेडात आलं.
मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सेलाना परिसरात एका तरूणाचा मृतहेह आढळला. ही माहिती तेथील स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरू केली. चौकशीत हा मृतदेह नवीन लग्न झालेल्या तरूणाचा असल्याची पोलिसांची खात्री झाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, तरूणीने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात काही जणांसोबत लग्न करून त्यांना लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यामध्ये पत्नी गायब असल्याची माहिती पोलिसांनी लागली. पोलिसांनी त्यांचं मोबाइल लोकेशन तपासायला सुरूवात केली. त्याचबरोबर लग्न ज्या संस्थेने जुळवले होते, तिकडे चौकशी सुरू केली. संस्थेने लग्नासाठी मुलाच्या घरातून अडीच लाख रूपये घेतल्याचे चौकशीत उघडकीस आले.
लग्न झाल्यानंतर माहेरी निघालेल्या नववधून गाडी मागविली होती. त्यामध्ये चार लोकं होती, त्यांनीच प्लॅन करून हत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या मोबाईलच्या लोकेशननुसार पाठलाग सुरू झाला. पाठलाग करत असताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण पोलिसांनी अखेरीस त्यांना एका ठिकाणी गाठून अटक केली.
तरूणीचे पहिले लग्न झाल्यापासून आपण आपल्या आई-वडिलांसोबत मागील तीन वर्षापासून राहत होतो. परंतु आपल्या आईवडिलांसोबत घरी भांडण झाल्यानंतर तरूणीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उत्तरप्रदेशातील एका व्यक्तीचा तरूणीशी संबंध आला. तो लग्नात तीचा भाऊ बनायचा असं तरूणीने पोलिसांना सांगितले. एका लग्नासाठी तरूणीला १० हजार रूपये मिळत होते. आतापर्यंत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अनेक तरूणांशी लग्न करून लुटले आहे. त्याचबरोबर मागील आठ महिन्यात सहा लग्न केल्याची माहिती सुध्दा चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितली.
सध्या उजेडात आलेल्या प्रकरणात नवरदेवाला लुटल्यानंतर त्याला चालत्या गाडीतून फेकून देण्यात आलं होतं. फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर तरूणानं घटनास्थळावरच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तरूणीसह चौघांना अटक केली असून लग्न संस्थेवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.