अकोल्यात ५८१ प्रशिक्षार्थ्यांनी घेतले पोलिस प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा ६२ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी मोठ्या थाटात पार पडला.

अकोला - पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा ६२ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी मोठ्या थाटात पार पडला. २० अाॅगस्टपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणामध्ये ५८१ प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायांना मूलभूत प्रशिक्षण देण्यात अाले. या दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांची उपस्थिती होती. 

सकाळी अाठ वाजता सुरू झालेल्या या दीक्षांत समारोहाची अनिल भंडारी यांनी मानवंना स्विकारली व परेडचे निरीक्षण केले. यावेळी परेड कमांडर, प्रशिक्षणार्थी अमोल गोपाळ बोधे व सेकंड इन परेड कमांडर प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वात शिस्तबद्ध व उत्कृष्ट कवायत संचलन सादर केले. त्याचबरोबर पोलिस प्रशिक्षणार्थी यांनी विविध चित्तवेधक व रोमहर्षक प्रात्याक्षिके सादर केली. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत वाघुंडे यांनी अहवाल वाचन केला. १९७० पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण केंद्रात अातापर्यंत २५ हजार ३३९ प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्याची माहिती देऊन त्यांचा अंतिम निकाल ९६ टक्के इतका लागल्याची माहिती देली.

यावेळी अनिल भंडारी यांनी अध्यक्षीय भाषणातून सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांची विशेष उपस्थिती होती. तर अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती. दीक्षांत संचलन सोहळ्यावेळी अंतिम परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन सर्वप्रथम अालेल्या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अजित सदाशिव डफळ यांच्यासह अांतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणात तसेच क्रिडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमुख अतिथीच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात अाले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News