शरजीलला समर्थन देणाऱ्या तरुणीसह 50 जनांवर देशद्रोहाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

शरजील इमामला समर्थन दिल्याप्रकरणी तरुणी उर्वशी चुडीवाला आणि 50 तरुणांवर सोमवारी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.

मुंबई: जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा स्कॉलर विद्यार्थी नेता शरजील इमामला समर्थन दिल्याप्रकरणी तरुणी उर्वशी चुडीवाला आणि 50 तरुणांवर सोमवारी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहीता 124अ (देशद्रेह), 153ब, 505, 34 या कलमानुसार आझाज मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.   

नागरिकत्व सुधारणा विधेयक (NCR) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (CAA) विरोधात आझाद मैदानावर एक फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी एनसीआर, सीएए विरोधात धोषणाबाजी केली आणि शरजील इमामला समर्थन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व उर्वशी चुडावाला या तरुणीने केले होते. या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राज्याचे विरोधी पक्षनेचे देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. काही सामाजिक सघटनांनी या व्हिडीओ वरुन सरकारवर जोरदार टिका केली आणि आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तरुणी उर्वशी चुडावा आणि 50 तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र, गुन्हा नोंदवलेल्या कोणात्याही तरुणाला अद्याप पोलिसांनी अटक केली नाही.

भारतापासून इशान्य कडील राज्य वेगळी केली पाहीजे आणि इशान्य राज्यांचा वेगळा देश निर्मान झाला पाहीजे असे वादग्रस्त विधान विद्यार्थी नेता शरजीत इमामने केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शरजीलवर देशद्रोहात गुन्हा नोंदवला. शरजीत हा बिहार राज्यातील जहानाबाद शहरातला रहीवाशी आहे. शरजीतला जहानाबाद शहरामध्ये पोलिसांनी अटक केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News