नाबाद ५००

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘घाडगे ॲण्ड सून’ या मालिकेला प्रेक्षकांनी अगदी आपलंसं केलं आहे. बघता बघता या मालिकेने ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. मालिकेला ५०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मालिकेच्या टीमने सेटवर केक कापून आनंद साजरा केला.

यापुढे या मालिकेत नवनवीनच ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शिवाय मालिकेतील मुख्य कलाकार चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमयेला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

चिन्मय म्हणतो, ‘मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले यावर माझा विश्‍वासच बसत नाहीये. ही मालिका करताना मला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेत अक्षय नावाचं माझं पात्र आहे.

मी कुठेही कार्यक्रमांसाठी बाहेर जातो तेव्हा प्रेक्षक मला ‘अक्की’ या नावानेच हाक मारतात. इतकी ही भूमिका त्यांना आपलीशी वाटते आणि याचा मला आनंदच आहे.’
 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News