रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 5 घरगुती उपाय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 August 2020

घरी बसून फक्त दररोज पाच गोष्टी केल्यास निश्चित रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आयुष्यभर त्याचा परिणाम जाणवेल.

रोगप्रतिकारक शक्ती अनेक आजारांना कमी करू शकते. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत. मात्र काही घरगुती उपाय करून रोगप्रतिकारक शक्ती वाढविता येते. त्यासाठी आयुर्वेदीक किंवा केमीकल औषधांची आवश्यकता नाही. घरी बसून फक्त दररोज पाच गोष्टी केल्यास निश्चित रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आयुष्यभर त्याचा परिणाम जाणवेल.

संतूलीत आहार 

दैनंदिन आहार संतूलीत घेतल्यामुळे युम्यूनिटती सिस्टीम बाढते. दररोज ताजी फळे, पालेभाज्या, ड्राय फ्रुट, दुध जन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे पोषण तत्व मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यातून फायबर, कॅलरीज, विटामिन, आणि लोह शरिराला मिळतात. त्यामुळे युम्यूनिटती पावर वाढते 

ताणतणावाचे व्यवस्थाप

दैनंदिन कामामुळे व्यक्तीवर प्रचंड ताण पडत असतो, त्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता अधिक असते. माणवाने ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. रोज थोडा वेळ स्वतःसाठी देऊन दिवसभराचा ताण कमी करता येतो

नियमित व्यायाम 

दररोज व्यायाम केल्याने शरीरातील क्रिया व्यवस्थित चालतात. वजन, चरबी कमी होते. त्यामुळे शरीरात असणारे हार्मोन्स नियंत्रित होतात. शरीर ताजंतवानं राहत, त्यामुळे नियमित व्यायाम खूप महत्वाचा आहे. 

मध्यापान टाळा 

दिवसभराचा थकवा घालण्यासाठी काही व्यक्ती मध्यापान करतात. त्यामुळे रोगप्रतिकार पेशी मृत पावतात आणि रोग होण्याची शक्यता अधिक असते. शरिरातल लिव्हर मद्यापानामुळे खराब होतो. त्यासाठी दारूचे व्यसन टाळावे आणि रोगापासून मुक्त व्हावे. 

धुम्रपान टाळा 

तंबाखू, बिडी, सिगरेट यामुळे शरीरात कार्बन मोनॉक्साइड, निकोटीन, नायट्रोजन ऑक्साईड असे विषारी पदार्थ जातात. त्यामुळे शरीरातील रोग प्रतिकार पेशी शराब होतात. विषाणूंवर हल्ला करण्यााची क्षमता कमी होतो आणि रोजांना आमंत्रन मिळते. तसेच कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे धूम्रपान करणे टाळावे आणि सदैव निरोगी राहावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News