दरवर्षी विद्यार्थ्यांना मिळणार 48 हजार शिष्यवृत्ती; आजच करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रत्येक सेमिस्टरला 60 टक्के किंवा 6 ग्रेड मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची शिष्यवृत्ती दिली जाईल. 

गुणवत्ता असूनही प्रतिकुल आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागते. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी ऑईल अॅड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ही तेलकंपणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. आर्थिक दृष्य दुर्बल
घटकातील अभियांत्रिकी, एमबीबीस, एमबीए, जीओफिजिक्स/ जिओलॉजी आदी अभ्यासक्रमांच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे गरजेचे आहे.   

किती मिळणार शिष्यवृत्ती:

सर्वांधिक गुण असलेल्या 500 विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी केली जाईल. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी 48 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रत्येक सेमिस्टरला 60 टक्के किंवा 6 ग्रेड मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची शिष्यवृत्ती दिली जाईल.  

शिष्यवृत्तीसाठी पात्रता:

अभियांत्रिकी, एमबीबीएस, एमबीए, जीओफिजिक्स, जिओलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गात शिकणारे गुणवत्ताधारक विद्यार्थी ओएनजीसी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. अभियांत्रिकी, एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत 60 टक्क्यापेक्षा अधिक मार्क असावेत तर एमबीए, जीओफिजिक्स, जिओलॉजी विद्यार्थ्यांना पदवीला 60 टक्क्यापेक्षा अधिक मार्क असावेत. विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापैक्षा अधिक नसावे. ही पात्रता पुर्ण करणारे विद्यार्थी अर्ज भरु शकतात. 

असा करा अर्ज:

ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी https://www.ongcscholar.org या अधिकृत वेबसाईटवर जावे. त्यांतर एक नविन पेज ओपन होईल. त्याच पदव्युत्तर (PG) आणि पदवी (UG) दोन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी एक लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर शिष्यवृत्तीचा फार्म ओपन होईल, त्यात दिलेली सर्व माहिती भरावी. सबमीट करण्यापुर्वी पुर्ण अर्ज भरला आहे याची खात्री करावी.

 

india

भारत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News