राज्यात पदवी शिक्षणासाठी ४७ नव्या महाविद्यालयांना मिळाली मंजुरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्याकरीता दरवर्षी होणारी रस्सीखेच पाहून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यावर्षी राज्यातील एकूण ४७ नव्या महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे.
  • या ४७ महाविद्यालयांपैकी १३ अकृषी महाविद्यालय ही ठाणे आणि मुंबई या शहरातील असून आता पदवी अभ्यासक्रमासाठी ३ हजार २४० नव्या आसन व्यवस्था निर्माण झाल्या आहेत.

मुंबई :- बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्याकरीता दरवर्षी होणारी रस्सीखेच पाहून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यावर्षी राज्यातील एकूण ४७ नव्या महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. या ४७ महाविद्यालयांपैकी १३ अकृषी महाविद्यालय ही ठाणे आणि मुंबई या शहरातील असून आता पदवी अभ्यासक्रमासाठी ३ हजार २४० नव्या आसन व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. तसेच या महाविद्यालयांनी मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यास यावर्षी पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे विद्यापीठ कायद्यानुसार संस्थांनी विद्यापीठांकडे पाठवलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून ४७ संस्थांना मान्यता देण्यात आली. या ४७ महाविद्यालयांपैकी १३ नवीन महाविद्यालये ही  मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत आहेत तर ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये आठ नवीन महाविद्यालयांचा समावेश करण्यात येणार आहे. 

कोकणपट्यातील जिल्ह्यांमध्ये नवीन आठ महाविद्यालयांना मजुरी मिळाल्यामुळे येथे प्रवेशासाठी १ हजार ८०० जागा वाढल्या आहेत तर मुंबई विद्यापीठा अंतर्गत १३ महाविद्यालयांना मजुरी दिल्याने येथे १ हजार ४४० जागांची वाढ होणार आहे.  मुंबईत शाखानिहाय वाढलेल्या जागांपैकी  कला शाखेत ९६०, वाणिज्य १३२०, विज्ञान ९६०, इतर विधी १८० जागा वाढल्या आहेत.  ठाणे आणि विलेपार्ले या शहरातील विधी अभ्यासक्रमाकरीता मंजुरी मिळालेल्या महाविद्यालयाय सुरु करण्याची परवानगी दिली गेली आहे. राज्यात मंजुरी देण्यात आलेल्या ४७ महाविद्यालयांपैकी सर्वात जास्त महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठा अंतर्गत येणार असून त्याखालोखाल अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठ, औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अंतर्गत प्रत्येकी ९ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता जागा उपलब्ध होणार असून त्यांचा मनस्ताप कमी होणार आहे. महाराष्ट्रातील नागपूर येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत ४, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर २, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली २, स्वामी रामानंद तीर्थ १ तर एसएनडीटी महिला विद्यापीठाला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्रत्येकी ३ नव्या महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News