विना परीक्षा ४ हजार उमेदवारांना मिळणार ONGC मध्ये थेट नोकरी; जाणून घ्या! कसा करावा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020

देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले. एकीकडे बेरोजगारी वाढळी असताना ओएनजीसीने रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) मध्ये ४ हजार पेक्षा अधिक अप्रेंडशिप पदांची भरती निघाली आहे. आयटीआय, डिप्लोमा आणि पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले. एकीकडे बेरोजगारी वाढळी असताना ओएनजीसीने रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तेल उत्पादणाची देशातील सर्वांत मोठी कंपनी म्हणून ओएनजीसीची ओळख आहे. 

 निवड प्रक्रीया

इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर जावून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. एकूण ४ हजार १८२ जागा भरण्यात येणार आहेत, त्यापैकी १ हजार ५७९ पश्चिम विभाग, ७१६ पुर्वी विभाग, २२८ उत्तर विभाग, २२१ केंद्रीय क्षेत्र आणि ७६४ मुंबईसाठी आहेत.    

शैक्षणिक पात्रता

  • सहाय्यक आणि अकाऊंट पदासाठी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून पदवी घेतलेली असावी. 
  • इतर ट्रेडसाठी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थांमधून आयटीआय, डिप्लोमा पास असावा
  • उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे पुर्ण ते २४ वर्षापेक्षा कमी असावे.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांना नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी लागणार आहे. त्यासाठी येथे क्लिक करावे लागेल. नोंदणीवेळी दिलेल्या इमेलवर कंपनीकडून युजर्स आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. त्यानंतर उमेदवाराला नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. त्यानंतर एक पेज ओपन होईल. यात युजर्स आयडी आणि पासवर्ड टाकून संपु्र्ण अर्ज भरावा लागेल. त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करावी लागणार आहे. सर्व तपशील भरल्यानंतर अर्ज सबमीट करायचा आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News