नीट परीक्षेसाठी विद्यार्थींनीचा ४०० किलोमीटरचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020

नीट परीक्षेसाठी विद्यार्थींनीचा ४०० किलोमीटरचा प्रवास

नीट परीक्षेसाठी विद्यार्थींनीचा ४०० किलोमीटरचा प्रवास

कोरोनाच्या काळात परीक्षा होणार की नाही याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी संभ्रमता निर्माण झाली होती. कारण परीक्षा होईल की नाही, झाली तर केव्हा होईल हे कोणीही निश्चिच सांगायला तयार नव्हतं. तसंच परीक्षा घेण्यास सध्याचं वातावरण योग्य आहे का ? असेही अनेक प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारले जाऊ लागले होते. अनेक दिवसांपासून रखडलेली वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आज देशातील  ३ हजार ८४२ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशातील १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला हजर होते. महाराष्ट्रातील २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यी परीक्षेला हजर होते. विशेष म्हणजे आजची परीक्षा मुंबईत सुरळीत पार पडली. परंतु या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यासाठी ३०० ते ४०० किलोमीटरचा प्रवास करावा लागला.

कोरोनाच्या काळात अनेकजण ग्रामीण भागात असल्याने परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना ३०० ते ४०० किलोमीटर अंतर पार करावे लागले. नंदुरबारक मधील एका विद्यार्थींने रात्री प्रवासाला सुरूवात केली होती. ती रात्री नंदुरबारहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. तिचं नाव एंजल गवित असून तिने परीक्षेसाठी ४०० किलोमीटरचं अंतर पार करून परीक्षा केंद्र गाठलं.  हा प्रवास करण्यासाठी तिला १३ हजार रूपयांचा खर्च आला आहे.

एंजल गवित ही परीक्षा मुंबईच्या केंद्रावर होणार असल्याने तिने कोरोना प्रादुर्भावामुळे खासगी वाहनाने परीक्षा केंद्रावर जाण्याचा निर्णय घेतला. तिच्यासोबत तिने बहिण आणि मैत्रीणीलासोबत घेतलं होतं. तिने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नंदुरबारमधील नवापूर येथून प्रवासाला सुरूवात केली. ठाण्यात पोहण्यासाठी त्यांना सात तासांचा अवधी लागला. १३ हजार रूपये देऊन त्यांनी भाड्याने गाडी केली होती. ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे त्या पोहचल्या. काहीवेळ आराम केल्यानंतर त्यांनी बोरिवलीला बसने जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना २ तास लागले. त्यानंतर बोरिवलीहून कांदिवलीसाठी ऑटो रिक्षाकरुन त्या परिक्षा केंद्रावर पोहचल्या.

कांदिवलीतील ठाकूर कॉलेजवर आज परीक्षा देण्यासाठी शहराबाहेरील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आज तिथल्या परीक्षा केंद्रावर साधारण १२ ०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांसोबत पालकवर्ग उपस्थित राहिल्याने कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे आजूबाजूची मैदाने आज खुली ठेवण्यात आली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांवर होणार याची काळजी कॉलेज प्रशासनाने घेतली होती. तसेच प्रत्येक कॉलेजवरती आरोग्याच्या अनुशंगाने सुविधा ठेवण्यात आल्या होत्या. कॉलेज प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे आज परीक्षार्थींना अंतरनियमांचे पालन करून केंद्रात प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे त्याआधी सुध्दा विद्यार्थांची तापसणी करण्यात आली. परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना कर्मचा-यांनी आज मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. कोरोनाच्या काळात जाहीर केलेल्या नियमावलीच्या आधारे एका वर्गात फक्त १२ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था कॉलेज प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News