शरीरासाठी प्रोटीन अतिशय महत्त्वाचे आहे. मासाहार खाणाऱ्या व्यक्तींना मासे, चिकन, मटन अंड्यामधून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. मात्र, शाकाहारी व्यक्तींना प्रोटीनसाठी काही विशिष्ट पदार्थ खावे लागतात. शाकाहरी व्यक्तीसांठी स्वस्त आणि मस्त व्हेजिटेबल प्रोटीनची यादी आम्ही सांगणार आहोत. अनेकांना व्हेजिटेबल माहिती असूनही त्याची मात्रा किती घ्यावी? याची कल्पना नसते. अशा व्यक्तींसाठी दिवसाला किती प्रोटीन सेवन करावे याची मात्र आम्ही सांगणार आहोत. शरीरामध्ये असणाऱ्या पेशी वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचबरोबर त्वचा आणि केस यांची निगाराखण्याचे प्रोटीन काम प्रोटीन करतो. त्यामुळे शरीराला प्रोटीन अत्यावश्यक आहे.
यापासून मिळतात भरपूर प्रोटीन
मसुर डाळ

मसुरीची डाळ आणि मसुरीची भाजी आपण अनेक वेळा जेवणामध्ये खातो. दाळीपासून पासून सर्वाधिक प्रोटीन मिळतात. एका वाटी मसूर दाळ पासून 200 ग्रॅम कॅलरीज मिळतात. सरासरी 15 ग्रॅम फायबर आणि 17 ग्रॅम प्रोटीन असतात. मसुरीची डाळ विविध रंगामध्ये बाजारात उपलब्ध होते. मसुरीच्या डाळीचे डायटमध्ये वापर केल्यास मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतील. हा दाळ पयाचला हलकी असते. त्यामुळे या दाळीचा वापर दैनंदीन जिवनात केल्यास उपयोग होतो.
कद्दुच्या बीया

कद्दुच्या बियापासून मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतात. डायटमध्ये व्हेजिटेबल म्हणून यांचा वापर करू करता येतो. कद्दूच्या भाजीपासून शरिराला विविध लाभ होतात. महत्त्व म्हणजे कद्दू खाल्ल्याने पोट साफ होते. 100 ग्रॅम कद्दूच्या बियाबासून 560 कॅलरीज मिळतात. सरासरी दिवसाचे 50 टक्के प्रोटीन 100 ग्रॅम बियापासून मिळते. त्यासाठी कद्दूची भाजी, आणि बिया खाणे शरिराला लाभगदायक आहे.
पांढरा हरभरा
पांढरा हरभरा हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. जी व्यक्ती मासे, मटन, चिकन, अंडे खात नाही त्याच्यासाठी पांढरा हरभरा प्रोटीनची खाण आहे. पाढऱ्या हरभऱ्यातून प्रोटीन मिळतात. हारभऱ्याची भाजी, हरभऱ्याच उसळ, किंवा भाजून, उकडून खाडा येते. हरभरा विविध पद्धतीद्वारे जेवनात वापरता येते.
बदाम
व्होजिटेबल मध्ये सर्वांत लोकप्रिय बदाम हा प्रोटीनचा खजिना आहे. बॉडी बिल्डर आणि दररोज व्यायाम करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रोटीनची गरज असते. ही गरज भरुन काढण्याचे काम बदाम करते. बदाम खाल्यांने शरीरातील हाडे, मास पेशी मजबूत होतात. आणि मोठ्या प्रमाणात प्रोटीन शरिराला मिळतात.
दिवसभरात किती घ्यावे प्रोटीनची मात्रा?
प्रोटीन हा शरीराला मजबूत करणारा महत्त्वपुर्ण घटक आहे. प्रोटीनमुळे शरीरातील मासपेशी, हाडे मजबूत होतात, मात्र प्रोटीनची मात्रा शरीरात जास्त झाल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवतात. प्रोटीन कमी झाल्यास शरीरातील मास पेशी कमकुवत होतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात प्रोटीनची मात्रा घेणे आवश्यक आहे. एक किलोसाठी एक ग्राम प्रोटीनची गरज असते आहे. उदा. ५० किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने ५० ग्रॅम प्रोकोटींची मात्रा घेणे गरजेचे आहे.
india
भारत