३ करोड ७५ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020
  • मानव संसाधन विकास मंत्रालयाचा केंद्र सरकाला प्रस्ताव

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्व शाळा, महाविद्यालय बंद केली. आणि ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली. मात्र लाखो विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी संसाधनांची कमतरता होती. त्यामुळे लाखो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहीले. साधनांची कमतरता भरुन काढण्यासाठी ३ करोड ७५ लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन मोफत देण्याचा प्रस्तावर मानव संसाधन विकास मंत्रालयाने केंद्र सरकार समोर मांडला. 

काय आहे प्रस्तावामध्ये?

देशातील महाविद्यालय, विद्यापीठ आणि विविध शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधने द्यावीत. असा प्रस्ताव मानव संसाधन विकास मंत्रालयाने केंद्रीय उच्च व तंत्र शिक्षण विभागासमोर ठेवला. यासाठी 5 वर्षात 60 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. सोमवारी 15 व्या वित्त आयोगासमोर हा खर्च मांडण्यात आला.   

राज्य सरकारवर पडणार भार

संपुर्ण योजना ५ वर्षात पुर्ण होणार आहे. त्यासाठी ६० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी राज्य सरकारला ३६ हजार ४७३ कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. सध्या देशातील विविध महाविद्यालय आणि विद्यापीठात ३ करोड ७५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरासरी एका साहित्यासाठी १५ हजार रुपये खर्च येणार आहे.

असा मिळणार विद्यार्थ्यांना लाभ

टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी साहित्य दिले जाणार आहेत, अशी योजना आखण्यात आली. २०२५- २६ पर्यंत ४० लाख विद्यार्थ्यांना इलेक्ट्रोनिक साधनांचे वाटप केले जाईल.  

टप्पा वर्षे विद्यार्थी
पहिला २०२१-२२ १.५ करोड  
दुसरा २०२२-२३ ५५ लाख
तीसरा २०२२३-२४ ६१ लाख
चौथा २०२४-२५ ६७ लाख
पाचवा २०२५-२६ ७३ लाख

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News