पोट कमी करण्यााचे ३ पर्याय; झोपण्यापुर्वी एक कप घ्या, चरबी कमी करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 August 2020

शरीराला एक विशिष्ट आकार असेल तर सुडोल आणि आकर्षक दिसतं, मात्र पोट पुढे आल्यामुळे शरीराचा संपूर्ण आकार बदलून जातो, त्यामुळे माणूस चित्र दिसायला लागतो. घरगुती उपाय करून चरबी कमी करता येते. चरबी कमी करण्यासाठी तीन घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत.

पोटाच्या चरबीमुळे अनेक समस्या उद्भवतात. पोट कमी करण्यासाठी दररोज व्यायाम, डायट केला जाते तरीदेखील पोटाचा आकार कमी होत नाही. अशा परिस्थितीमध्ये एका छोट्याशा ड्रिंकमुळे पोटाचा आकार कमी होऊ शकतो. अनेकांना चरबीची समस्या असते, चरबी कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जातात. मात्र चरबी कमी होताना दिसत नाही. शरीराला एक विशिष्ट आकार असेल तर सुडोल आणि आकर्षक दिसतं, मात्र पोट पुढे आल्यामुळे शरीराचा संपूर्ण आकार बदलून जातो, त्यामुळे माणूस चित्र दिसायला लागतो. घरगुती उपाय करून चरबी कमी करता येते. चरबी कमी करण्यासाठी तीन घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत, त्यापैकी एक उपाय केला तर चरबी कमी होईल आणि मनुष्य ताजंतवानं दिसेल. जाणून घेऊया कोणते आहेत तीन ड्रिंक जे वेटलॉस कमी करायला मदत करतील.

दालचिनी चहा 

दालचिनी चहा वजन कमी करण्यासाठी आदर्श मानला जातो. रोज संध्याकाळी झोपताना दालचिनीचा चहा सेवन केल्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. दालचिनी चहाचा वास येत असेल तर त्यामध्ये मद मिसळून सेवन करावे. दालचिनीमध्ये अॅटीअक्सिडेंट हे घटक असल्यामुळे वजन वाढवण्यासी मदत होते. एका पातेल्यात पाणी घेऊन जॅसवर गरम करा. गरम पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर टाका. पाणी आणि दालचिनी यांना थोडा वेळ गॅसवर वितळू द्या. त्यानंतर गॅस बंद करून खाली उतरवा. एका कपामध्ये दालचिनी चहा घेऊन दररोज संध्याकाळी झोपण्यापुर्वी घ्यावे, पंधरा दिवस ही प्रक्रिया केल्यानंतर वेटलॅक कमी होईल.

मेथी चाय

मेथी अनेक रोगांवर वरदान मांडली जाते. मेथीच्या चहामध्ये फायबर आणि पचनक्षमता वाढवण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे फॅट कमी करण्यास या गोष्टी मदत करतात. दालचिनी चहा पिऊन कंटाळा आल्यानंतर मेथीचा चहा हा दुसरा ऑप्शन तुमच्यापुढे उपलब्ध आहे. त्यामुळे फक्त चरबी कमी होत नाही तर अनेक कमी होण्यास मदत मिळते. एक कप पाणी घेऊन गॅसवर ठेवा. त्यामध्ये एक चमच मेथी टाका, त्यानंतर मेथीचा कलर हलका होईल आणि संपूर्ण मेथी पाण्यामध्ये मिसळून जाईल, हा चहा संध्याकाळी रोज घ्यावा. कडवटपणा जाणवत असेल तर यामध्ये गुळ वापरू शकतात त्यामुळे चहाला स्वाद येतो.

जीरा आणि ओवा ज्यूस 

वजन कमी करण्यासाठी जीरा आणि ओळा महत्त्वाचा आयुर्वेदिक पदार्थ आहे. जिरामध्ये मेटाबोलिक पदार्थ असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरामध्ये असणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत होते. जिरा आणि ओळा यांचे ज्युस शरीरासाठी पोषक आहे. जीरा आणि ओवा याचे तुकडे करुन करून मिक्सरमध्ये बारीक घ्यावे. चांगल्या प्रकारे एकमेकात मिसळू द्यावे. एक कप गरम पाण्यात टाकून रोज झोपण्यापुर्वी सेवन करावे. स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये अद्रक आणि लिंबू मिसळू शकता. हे तीन पर्याय वजन कमी करण्यासाठी उपलब्ध आहेत. कमीत कमी पंधरा दिवस दररोज झोपण्यापूर्वी याचा चहा घ्यावा लागेल. तेव्हा वजन कमी होण्याचे परिणाम जाणवतील.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News