विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • सेस फंडाचा उपयोग; सावर्डे पंचक्रोशीतील दहा विद्यार्थी

चिपळूण - येथील पंचायत समितीतर्फे सेस फंडातून एकात्मिक  बाल विकासतर्फे तालुक्‍यातील २८ शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. सभापती पूजा निकम यांच्या हस्ते सावर्डे पंचक्रोशीतील १० विद्यार्थिनींना मोफत सायकलचे  वाटप केले. 

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे आर्थिक दुर्बल व गरजू महिला व शालेय विद्यार्थिनींसाठी विविध योजना राबवल्या जातात. यावर्षी पाचवी ते बारावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थीनीना सायकल वाटप करण्याचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत झाला होता. घरापासून शिक्षणासाठी दूर जाणाऱ्या व गरजू शालेय विद्यार्थिनीना सायकल देण्याचे ठरले होते.

सायकली खरेदी करून त्याची बिले एकात्मिक बाल विकास प्रकल्पाकडे सादर केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना त्याचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. सभापती निकम यांनी याकामी पुढाकार घेतल्याने सावर्डे पंचक्रोशीतील विद्यार्थीनिना त्वरित विनासायास सायकली मिळण्यास मदत झाली. यावेळी सावर्डे, हडकणी, डेरवण, आगवे, कोंडमळा येथील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती निकम, सावर्डेचे सरपंच सुभाष मोहिरे, राष्ट्रवादीचे नेते विजय गुजर, पंचायत समिती सदस्य प्रकाश कानसे  उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News