BoardExam 2020 : राज्यातल्या 4979 केंद्रावर देणार 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा

यिनबझ टीम
Tuesday, 3 March 2020

दरवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामामार्फत घेतली जाणारी दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. त्यासाठी राज्यातल्या 4979 केंद्रावर तब्बल 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी हाच आकडा 17 लाख 818 इतका होता.

17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या 9 लाख 75 हजार 894 इतकी आहे तर मुलींची संख्या 7 लाख 98 हजार 894 इतकी आहे. या वर्षी परीक्षेसाठी तब्बल 22 हजार 586 शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. 

परीक्षा काळात विद्यार्थ्यांकडून होणारे गैरवर्तन, तसेच संभाव्य गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी एकुण 273 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून होणारे गैरव्यवहार टाळणयासाठी शिक्षण तसेच शिक्षण मंडळ सर्वोत्तोपरी प्रयत्न करेल, अशी माहितीही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News