जीवनदीप महाविद्यालयात "राष्ट्रीय विज्ञान दिन" मोठया उत्साहात साजरा 

दिव्येश जाधव
Saturday, 29 February 2020

देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी रमण परिणाम ही जीकिमया केली होती. त्यामुळे त्यांना भौतिकशास्त्र या विषयात आजच्या दिवशी १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या घटनेची साक्ष म्हणून आजच्या दिवशी देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.

खर्डी - जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी येथे शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विज्ञान विभागाच्या वतीने विविध देखाव्यांचे प्रदर्शन सादर केले होते.

देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी रमण परिणाम ही जीकिमया केली होती. त्यामुळे त्यांना भौतिकशास्त्र या विषयात आजच्या दिवशी १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या घटनेची साक्ष म्हणून आजच्या दिवशी देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणुन वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. आनंद भागवत सर, जीवनदीप शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष श्री. रविंद्र घोडविंदे सर तसेच जीवनदीप महाविद्यालय खर्डी चे प्रा. प्रा. के. आर. कळकटे सर उपस्थित होते. 

या निमित्ताने आंनद भागवत सरांनी विज्ञान प्रदर्शनाचे उद्धाटन केले सोबत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबत मार्गदर्शन केले. प्रदर्शनास वाणिज्य व विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला व आपली प्रदर्शने सादर केली. या प्रसंगी विज्ञान शाखेचे शिक्षक प्रा. चारुशिला सोनकांबळे, प्रा. भूषण विशे व प्रा. प्रणोती शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यी उपस्थित होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News