जीवनदीप महाविद्यालयात 'मराठी राजभाषा दिन' उत्साहात संपन्न 

दिव्येश जाधव, खर्डी
Thursday, 27 February 2020

खर्डी - जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी येथे आज दि. 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त "मराठी राजभाषा दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.

खर्डी - जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी येथे आज दि. 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त "मराठी राजभाषा दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.

कवी कुसुमाग्रजांच्या कवितेचे पूजन करून व मराठी अभिमान गीत गाऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. रेश्मा घोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना "मराठी भाषेची थोरवी व त्यांच्या साहित्याचा परिचय" करून दिला. तर प्रा. किशोर पवार यांनी विद्यार्थ्यांना, "मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व क्षेत्रात मातृभाषेचा वापर कसा करता येईल" याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिप्ती मोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन SYBA ची विद्यार्थिनी कु. वृषाका शहा हिने केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आज काव्यवाचन सादर केले. त्यामध्ये वृषाका शहा (syBA), विशाल शिंदे (syBA), प्रियांका रोज (tyBA), जयश्री जाधव (tyBA), गुरुनाथ पानगा (tyBA), कैलास लांघी (tyBA) या विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज, कवी सुरेश भट, कवी इंद्रजित भालेराव, कवी मंगेश पाडगावकर, कवी नरेश पाटील, कवी वैभव जोशी या कवींच्या कविता सादर केल्या. 

त्यांच्या काव्यवाचनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News