के. एल. ई. महाविद्यलयाची प्रिंटिंग प्रेसला भेट 

दिव्या चौधरी
Thursday, 27 February 2020

नवी मुंबई - घनसोली मधील महापे येथील लोकमत प्रिंटिंग प्रेसला 'के. एल. ई महाविद्यालय, कळंबोलीच्या विदयार्थ्यांनी भेट दिली. ही औद्योगिक भेट बुधवारी २६ फेब्रुवारीला देण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील बॅचलर ऑफ मास मिडीया (बीएमएम) आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (बीएमएस) च्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

यावेळी लोकमत प्रिंटिंग प्रेस, महापेच्या सरक्यूलेशन विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या रोहन आंब्रे यांनी विदयार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. यावेळी लोकमत वृत्तपत्राचा इतिहास आणि त्याची सविस्तर माहिती यावेळी विद्यार्थ्यांना जाणून घेता आली. 'लोकमत वृत्तपत्राच्या 'हॅलो', 'ऑक्सिजन', 'लोकमत सखी', 'मंथन' यांसारख्या काही प्रसिद्ध पुरवण्यांमुळे लोकमत आज 'नं. १' वृत्तपत्र आहे', असे रोहन आंब्रे यांनी सांगितले. 

त्यानंतर तांत्रिक विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रवीण पाटील यांनी वृत्तपत्रासंबंधातील सर्व तांत्रिक माहिती दिली, त्यामध्ये त्यांनी वृत्तपत्र कसे छापतात,  रंगीत आवृत्ती कशी छापली जाते, एका दिवसाला किती वृत्तपत्रे छापली जातात, वृत्तपत्र छापणाऱ्या मशीनचा वेग या सर्व गोष्टींची माहिती विदयार्थ्यांना दिली. 

या औद्योगिक सहलीमध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. वृत्तपत्राची छपाई विदयार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळाली. लोकमतचे चेअरमन विजय दर्डा आणि त्यांच्या सर्व टीमने एका व्हिडिओमार्फत लोकमतची संपूर्ण माहिती दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News