छायाचित्रणातून सामाजिक विषय मांडले पाहिजेत : पद्मश्री सुधारक ओलवे

आदित्य येवले
Thursday, 27 February 2020

ठाणे -  ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात दरवर्षी "डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असले. ठाण्याच्या सांस्कृतीत मोलाची भर घालणाऱ्या विद्या प्रसारक मंडळाचे स्वर्गीय डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या तपस्वी जीवनाला श्रद्धांजली म्हणून ही व्याख्यानमाला जोशी बेडेकर महाविद्यालयात आयोजित केली जाते. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पद्मश्री सुधारक ओलवे यांचे "सामाजिक माहितीपट छायाचित्रण" या विषयावर  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे हे 22 वे पुष्प. 

आपल्या व्याख्यानात श्री सुधारक ओलवे यांनी त्यांच्या सामाजिक विषयावर आधारित छायाचित्रांचे सादरीकरण केले.  मुंबईतील 1993 सालचे दंगे, पोलीस चकमकी, 26/11 चा बाँब हल्ला इत्यादी अनेक विषयांवर छायाचित्रे सादर करत तिथल्या परिस्थितीची जाणीव करुन दिली. एकट्या मुंबईचा कचरा व नाले सफाईसाठी किमान 40 हजार साफसफाई कामगार काम करतात. त्यांना मोठ्या हलाकीच्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. स्वच्छता करतानाचे हृदय हेलवणारी छायाचित्र मालिका त्यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांसमोर सादर केली.

नवीन पिढी संवेदनशील बनवण्यासाठी व आपल्या सामाजिक परिस्थितीला योग्य प्रतिसाद देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग झालं पाहिजे, असं मत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी प्रास्ताविक सादर करताना मांडलं. कार्यक्रमाचे संयोजन  जनसंज्ञापन विभागाचे समन्वयक डॉ. महेश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मानसी जंगम यांनी केले. व्याखानास विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यान झाल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरांचा तासदेखील छानरित्या रंगला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News