"मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात महाविद्यालयीन तरुणांचे कलाविष्कार सादर"

सागर वाघ, येवला
Tuesday, 25 February 2020

नाशिकच्या "मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात महाविद्यालयीन तरुणांचे कलाविष्कार सादर"

नाशिक - सोमवार, दि 24 फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आई फाऊंडेशन, मुंबई मार्फत 'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कवी सम्मेलन, काव्य वाचन, नृत्य, वकृत्व, गायन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विश्वास लॉन्स, सावरकर नगर, नाशिक येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

मराठी राजभाषा दिना निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. यानिमित्ताने महाविद्यालयीन तरुणाईचा कलाविष्कार बहरून आला होता. या कलाविष्कारात नृत्य प्रकारामध्ये देवीचा जागर, महाराष्ट्र व ओरिसा येथील प्रसिद्ध नृत्य, गर्जा महाराष्ट्र, वकृत्व स्पर्धामध्ये भारतीय संस्कृती, गायन स्पर्धेत लोकगीत, पोवाडा व काव्य वाचन स्पर्धांमध्ये कुसुमाग्रज, ग. दी. मांडगुळकर इ. कवींच्या तसेच स्वरचित कविता तरुणांकडून सादर करण्यात आल्या.

सदर कार्यक्रमाचे परिक्षण कवी अमोल  शिंदे, डॉ. राजेंद्र सांगळे, सौ. वैभवी लोहोकरे, श्री. जयेश ठाकुर आणि कु. सम्रुद्धी महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक येथील कवी, लेखक हनुमंत चव्हाण यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 
नृत्य प्रकार

प्रथम - के. एस. के. डब्ल्यू. कॉलेज, सिडको
द्वितीय - के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेज, पंचवटी
तृतीय - एम. एस. गोसावी कॉलेज, नाशिक

वकृत्व स्पर्धा 
प्रथम - शरयू सोनवणे 
द्वितीय- यश तावडे
तृतीय - वरद सोनवणे  
विभागून - शुभम हिरे

गायन स्पर्धा
प्रथम - वरद सोनवणे 
द्वितीय - शुभम हिरे 
तृतीय - साक्षी झेंडे 

काव्य वाचन स्पर्धा 
प्रथम - शरयू सोनवणे 
द्वितीय - वेदश्री कुलकर्णी 
तृतीय - तुषार पाटील 
विभागून - पियुष लाड
- वरद सोनवणे  
असे निकाल जाहीर करण्यात आले. 

कार्यक्रमाचे संयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग नाशिक, जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र आहिरे व सर्व कार्यक्रम अधिकारी, आय फाऊंडेशन, मुंबईचे मा. श्री. राकेश सोनवणे यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी विभाग समन्वयक डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा. समीर लिंबारे, प्रा. स्वानंद डोंगरे, सकाळचे प्रतिनिधी श्री. हनुमंत चव्हाण व विविध महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News