चलनी नोटा आरोग्यासाठी घातक; स्वामी विवेकानंदच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

आकाश गायकवाड
Saturday, 22 February 2020
  • महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी माइक्रोस्कोप आधारे संशोधन केलेले बुरशीचे प्रकार
  • चलनी नोटा आरोग्यासाठी घातक, स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन

जालना : रोजच्या आयुष्यात दैनंदिन व्यवहाराच्या कामकाजात चलनी नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु याच नोटा आरोग्यासाठी घातक असल्याचे संशोधन मंठा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. शहरातील व्यापारी, भाजीविक्रेते, हमाल, शेतकरी, बँकेतील कर्मचारी, फेरीवाले यांच्याकडे असणाऱ्या दहा, वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा अभ्यास केला. संशोधन केल्यावर विद्यार्थ्यांना नोटावर सोळा प्रकारच्या बुरशी आढळून आल्याचे समजले. 

नोटावरील बुरशीचा अभ्यासाकरिता विद्यार्थ्यांनी पोटॅटो डेक्स्ट्रोज आगार वापरले असता, नोटांवर ऍस्परजील्लस नायगर, फ्लावस, पेनिसिलियम नोटॅटम, लारिय, अल्टरणारिया, कॅंडिडा अल्बिकॅन्स, क्लॉडोस्पोरीयम अशा सोळा प्रकारच्या घातक बुरशींचे प्रमाण आढळले आहे. 

नोटा घामाच्या संपर्कात आल्यास बुरशींना खाद्य मिळते. परिणामी नोटांची झीज होतेच परंतु नोटा खिशात राहील्यास त्वचेचे आजार, कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचे मत संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. राजेंद्र काकडे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी एक महिना संशोधन केले. बीएस्सी तृतीय वर्षातील पवन झोल, दीपक तोडकर, रेखा देशमुख, पूजा बोराडे, विजया पोखरकर, शिवाणी शहाणे, शुभांगी कदम, त्रिवेणी निर्वळ, राणी भूतेकर, शुभकामना दायमा, विष्णू लोमटे, योगेश आवटे यांनी संशोधन केले आहे. डॉ. राजेश गायकवाड, डॉ. बापू सरवदे यांनी
संशोधनासाठी मार्गदर्शन केले. 

नोटांवर आढळणाऱ्या बुरशीचे आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे. यापूर्वी केवळ नांदेड आणि जम्मू येथे संशोधन झाल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आमचे सहकार्य राहील. - डॉ. भारत खंदारे (प्राचार्य)

नोटांवर आढळलेल्या बुरशीवर उपाय योजन करण्यासाठी आम्ही किकर (एंझाइम) पद्धतीचा वापर करणार आहोत. नोटांचे नुकसान टाळण्यासाठी लवंग तेल, तुळशी तेलाचा वापर करून पुढील संशोधन करणार आहे. - पूजा बोराडे (संशोधक विद्यार्थिनी)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News