एस. एन. डी. महाविद्यालयात जागतिक मातृभाषा दिवस साजरा

सागर वाघ, येवला
Thursday, 20 February 2020

गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येवला येथे जागतिक मातृभाषा दिवस संपन्न झाला. 

या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे अध्यक्ष स्थानी होते. तसेच महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. धनगे जी. बी. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. 

महाविद्यालया तर्फे वरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ठाकरे, एस. बी. यांनी केले. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त प्रा. धनगे जी. बी. यांनी मातृभाषेच्या वापराचे महत्व व फायदे विषद केले. तसेच इयत्ता बारावी पर्यन्त विज्ञानाचे शिक्षणही मातृभाषेत दिले जावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे यांनी मातृभाषा ही जीवनाची शिदोरी असून तिची साथ माणसाला आयुष्यभर पुरते. मातृभाषेतून माणूस कोणत्याही गोष्टीचे लवकर आकलन करून घेतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात मातृभाषा एक अमृतच आहे. असे प्रतिपादन केले. या प्रसंगी प्रा. काथेपुरे जी. पी. व प्रा. करंजकर एस. एम. यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन प्रा. दिपक मढवई, यांनी केले. आभार प्रा. संतोष आहेर यांनी मानले.

या प्रसंगी प्रा. सुनिल खैरनार, प्रा. माधव बनकर, प्रा. ललित घाडगे, प्रा. नितीन साळवे, प्रा. अमोल पवार, प्रा. सुनिल पवार, प्रा. मोहित गवारे, प्रा. अजय आदमाने, प्रा. बाबसाहेब गाडेकर, प्रा. भाऊसाहेब जाधव, प्रा. आण्णा व्हडगळ, प्रा. महेंद्र म्हसे, प्रा.लक्ष्मण देवढे, प्रा. तृप्ती काळंगे, प्रा. साळवे, प्रा. देवकर, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. निता मोरे, प्रा. जयश्री आहेर, प्रा. रचना भागवत, प्रा. सोमनाथ डूबे प्रा. चव्हाणके,  श्री. दीपक जाधव, प्रा. कुणाल भावसार, सौ. सुखदा देवगावकर, प्रा. अफसाना कादरी, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, श्री. नवनाथ सुराळकर, श्री. श्रावण गायकवाड, श्री. किरण मुंढे व श्री. प्रवीण मोरे सौ. मेनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News