166 विमानाद्वारे 25 हजार 620 प्रवाशी राज्यात दाखल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020
  • 1 जुलैपर्यंत फेज 3 च्या उर्वरित 15 तसेच फेज 4 च्या 21 अशा एकूण 36 विमानांतून प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.

 मुंबई : वंदे भारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर 25 हजार 620 प्रवाशांचे आगमन झाले असून, यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 9391 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी 8576 असून, इतर राज्यांतील प्रवाशांची संख्या 7653 आहे. हे प्रवासी 166 विमानांनी मुंबईत दाखल झाले आहेत. 1 जुलैपर्यंत फेज 3 च्या उर्वरित 15 तसेच फेज 4 च्या 21 अशा एकूण 36 विमानांतून प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यांतील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांतील व राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

या देशातून आले प्रवासी

प्रवासी विविध देशांतून आले असून त्यात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलॅंड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आयर्लॅंड, कतार, हॉंगकॉंग, कझाकिस्तान, मॉरिशस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडीज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्यूयार्क, जॉर्जिया, कामेरूनया देशांचा समावेश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News