शाहरूखकडून 25 हजार पीपीई किट्‌स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 April 2020
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून शाहरूखचे आभार मानले आहेत.

मुंबई: कोरोनाच्या संकटाविरोधात लढण्यासाठी चित्रपटसृष्टीही सरसावली आहे. काही दिवसांपूर्वी आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर शाहरूख खानने वैद्यकीय कर्माचाऱ्यांसाठी तब्बल 25 हजार पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍टिव्ह इक्विपमेंट) किट दिले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून शाहरूखचे आभार मानले आहेत.

"आपल्या वैद्यकीय पथकांचे हे पीपीई किट्‌स रक्षण करतील आणि कोरोनाविरोधातील लढाईत त्यांची खूप मदत होईल'' असे त्यांनी म्हटले आहे. "नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण एकत्र लढू या. तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली याचा आनंद आहे'' अशी भावना शाहरूखने ट्विटरवरून व्यक्त केली.

याआधी शाहरूखने वांद्रे येथील त्याची एक इमारत मुंबई महापालिकेला विलगीकरण केंद्रासाठी दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्स हा त्याचा आयपीएलमधील संघ आणि मीरा फाऊंडेशन, रेड चिली एंटरटेन्मेंट या कंपनीद्वारे त्याने आर्थिक मदत केली आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News