महाड दुर्घटनेतील बचावकार्यास गती देण्यासाठी २४ वर्षीय तरुणाने केले प्रशंसनीय काम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020
  • रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तारिक गार्डन ही पाच मजली इमारत २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास कोसळली.
  • ही इमारत  कोसळून या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड :-  रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तारिक गार्डन ही पाच मजली इमारत २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास कोसळली. ही इमारत  कोसळून या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळल्या पासून, ह्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरीता बचावकार्य सुरु झाले. या घटनेला ४० तास उलटून गेले असले तरी येथील बचाव कार्य अजूनही सुरु आहे.  इमारत कोसळण्यानंतर मलबा दूर करण्यासाठी ८ तव, १० जेसीबी, १५ डंपर तसेच ४ पोखलेनचा वापर करण्यात आला. दुर्घटना झाल्यानंतर तेथील बचाव कार्यासाठी अग्निशामक दल, एनडीआरएफ, सामाजिक संस्था यांनी याठिकाणी युद्ध पातळीवर काम केले. 

महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्याला गती देण्यासाठी २४ वर्षीय तरुणाने तब्बल २६ तास अविरत पोकलेन चालवण्याचे काम केले. ह्या तरुणाचे नाव किशोर भागवत लोकांडे असून तो मूळचा बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी इथला राहणार आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी तसेच बचावकार्यास गती मिळण्यासाठी किशोर लोखंडे या तरुणाने लगातार २६ तास  प्रशंसनीय काम केल्याने सर्व स्थरातून त्याने दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक केले जात आहे. 

महाड तालुक्यातील तारिक गार्डन या इमारतीत एकूण ४१ कुटुंब राहत होते. मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन येथील परिस्तिथीचा आढावा घेतला. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच याप्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे देखील सांगण्यात आले. शासन व्यवस्थेसोबतच साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम या संस्थांनी बचावकार्यात मोलाचे योगदान दिले. दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाच्या मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे ४ लाख तर मुख्यमंत्री सहाय्य निधीतून १ लाखांची मदत दिली जाणार आहे. तसेच ज्या लोकांनी या दुर्घटनेत आपले घर गमावले आहे त्यांनाही शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News