राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दयानंद कलाच्या रासेयोमार्फत रॅलीचे आयोजन

विष्णु चंदुरे, लातुर
Saturday, 25 January 2020

24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून दयानंद कला महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने "बेटी बचाओ, बेटी पढाओ" हा संदेश देत भव्यदिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

लातूर - 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून दयानंद कला महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने "बेटी बचाओ, बेटी पढाओ" हा संदेश देत भव्यदिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ. शिवाजी जवळेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. दयानंद कला महाविद्यालयापासून निघालेली ही रॅली प्रकाश नगर मार्गे पुन्हा दयानंद कला महाविद्यालयातपर्यंत पोहोचली.

या रॅलीत 356 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीच्या समारोपप्रसंगी दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या कलावंत व खेळाडू मुलींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यात कु. स्वरांजली पांचाळ हिने 'झी युवा' या वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' कार्यक्रमात महाराष्ट्रातून सर्वप्रथम आल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कु. श्रद्धा नरसिंगे हिचा लखनौ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात लोकगीतात सहभागी होऊन तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कु. तनुजा शिंदे हिने लखनौ येथील राष्ट्रीय युवा महोत्सवात लोकनृत्य प्रकारात यशस्वी सहभाग नोंदविल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कु. प्रतिक्षा पाटवकर हिने स्वारातीम विद्यापीठाच्या युवक महोत्सवात अभिनयात सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कु. सुषमा शिंदे हिचा धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल व शासनाच्या पाच टक्के आरक्षणात सहभागी झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कु. दिव्या ठाकूर हिने बेंगलोर येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला, ऑल इंडिया मिनी ऑलंपिक स्पर्धेत राजस्थान येथे निवड झाल्याबद्दल व 400 मीटर धावणे स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कु. वैष्णवी जाधव हीचा धावणे या स्पर्धेत चार वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग, मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्र. प्राचार्य शिवाजी जवळेकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, अधीक्षक नवनाथ भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विभागीय समन्वयक डॉ. संदिपान जगदाळे, कार्यक्रमाधिकारी डॉ. अंजली जोशी, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. महेश जंगापल्ले, विद्यार्थी प्रतिनिधी विष्णू चांदूरे यांनी परिश्रम घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News