श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयात सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट चर्चासत्र संपन्न

अखिल मुंडले, भंडारा
Saturday, 25 January 2020

शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, पवनी येथे संगणक विभाग व करिअर काउंन्सलिंग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. 

पवनी - शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, पवनी येथे संगणक विभाग व करिअर काउंन्सलिंग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. 

त्यात सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावर श्री. रविंद्र मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले त्यात महाविद्यालयातील २५०-३०० विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लेपसे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. किशोर नगरनाईक, संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल पतंगे, करिअर कॉउंन्सलिंग सेलचे समन्वयक डॉ. संजय रायबोले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कृष्णा कारू, सूत्रसंचालन वैदेही पोर्लीकर तर आभार रूचिका मोटघरे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक सोसायटीचे अध्यक्ष कु. निरू हेमने, सोसायटीतील सर्व सदस्य व विभागातील सर्व विद्यार्थी यांनी अथक सहकार्य केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News