विद्यार्थी आंदोलनावेळी बजावलेली पोलीसांची भुमिका अयोग्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काही विद्यार्थी संघटनांनी ‘महाविद्यालय बंद’ची हाक दिली. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या त्याचसंदर्भात दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील विष्णू लहू चांदूरे यांनी या हल्ल्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विद्यार्थ्यांमधील सध्याच्या अवस्थेमागची कारणे राजकीय असून त्यासोबतच  विद्यार्थी सतत करिअरबाबत अस्वस्थ असेलेले  दिसून येतात.  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजकारणात सहभागी व्हावे कारण विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच राजकीय घडामोडींची जाण असायला पाहिजे सोबतच आजचे विद्यार्थी उद्या चालून देशाचे नेतृत्व व्यवस्थितरित्या करतील. देशातल्या विविध राजकीय पक्ष आणि संघटना आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुरेपूर वापर करताना दिसून येत आहेत. त्यासोबतच विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या प्रश्नाविषयी काही प्रमाणात जागरूक आहेत, तर काही संघटना या कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे दिसून येते त्यामुळे त्या जास्त प्रमाणात राजकीय प्रश्नांविषयी जागृत आहेत असे दिसून येते. हे सगळं सुरू असताना राजकीय भूमिका घेऊन व्यक्त होण्याऐवजी मला समाजातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच मी सामाजिक कार्य करण्यासाठी प्रयत्न करेन आणि जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याविषयी सांगायचं झाल्यास हा हल्ला अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरचा हल्ला. आहे, असेच मी म्हणेन.  शासन, धर्मसंस्था आणि समाज/ वेगवेगळे समाजघटक वेळोवेळी आपली सत्ता अथवा प्राप्तस्थानाचे निरंकुशत्व जपण्याकरिता विरोधी विचारांवर नियंत्रण मिळवण्याकरिता अथवा विरोधीविचार नामशेष करण्याकरिता अथवा तो सामान्यजनांपर्यंत न पोहोचु देण्याच्या दृष्टीने पहिला बळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा घेतात. त्यामुळे हा झालेला हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आहे, हे नक्की. सध्या सुरू असलेली पोलिसांची भूमिका अयोग्यच आहे. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही केली पाहिजे, जेणेकरून लोकांचा पोलिस यंत्रणेवर विश्वास बसेल.

- विष्णू लहू चांदूरे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News