BJP नेत्याचं वक्तव्य; JNU चे हल्ले थांबवायचे असतील तर पहिला कुलगुरुंना हटवा

यिनबझ टीम
Friday, 10 January 2020

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी जेएनयूचे कुलगुरू पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी जेएनयूचे कुलगुरू पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.

भाजप नेते जोशी म्हणाले की मानव संसाधन विकास मंत्रालयाने कुलगुरू जगदीश कुमार यांना दोनदा हा वाद मिटविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट घेण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तसे केले नाही आणि जिद्दी वृत्ती कायम राखली. ते म्हणाले की, आता जगदीश कुमार यांना जेएनयूचे कुलगुरूपदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी ट्वीट केले की, “वाढीव शुल्कावरील वाद सोडविण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने जेएनयूच्या कुलगुरूंना दोनदा प्रभावी फॉर्म्युला लागू करण्यास सांगितले आहे, असे मत जोशी यांनी मांडले आहे.

मुरलीधर जोशी म्हणाले की, 'कुलगुरू जगदीशकुमार यांनाही विद्यार्थी व शिक्षकांशी बोलण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु सरकारच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याबाबत कुलगुरूंची भूमिका हट्टी असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा कुलगुरूंना पदावर टिकू दिले जाऊ नये, असेही ते म्हणाले आहेत, त्यामुळे येत्या पुढील काळात कुलगुरू जगदीशकुमार हे राजिनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News