एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात  निनाद युवा महोत्सवाचे उदघाटन

सागर वाघ, येवला
Tuesday, 7 January 2020

दिनांक 6 जानेवारी 2020 पासुन एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात  निनाद युवा महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले असुन प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. खैरनार सुनिल व प्रा. शिवाजीराव बेंद्रे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

दिनांक 6 जानेवारी 2020 पासुन एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात  निनाद युवा महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले असुन प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. खैरनार सुनिल व प्रा. शिवाजीराव बेंद्रे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गणपत धनगे यांनी प्रास्ताविक मांडले. युवक महोत्सव आठवडाभर चालनार आहे. यात  6 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत वेगवेगळे डे साजरे करण्यात येणार असुन स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ खुले करून दिले  आहे, यात वेगवेगळ्या स्पर्धांची पर्वणीच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

पहिल्याच दिवशी कॉलेजच्या मुलींनी साड्या नेसुन व मुलांनी व्यावसायिक कपडे परिधान करुन आपली कला सादर केली. तसेच बहुसंख्य मुलांनी व मुलींनी वक्तृत्व स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. या सर्व स्पर्धांचा निकाल बक्षीस वितरण सोहळ्यात घोषित केला जाणार आहे. यासाठी  प्रा. गोरखनाथ काथेपुरे, प्रा. माधवराव बनकर, प्रा. नितीन साळवे, प्रा. सुनिल पवार, प्रा. अमोल पवार, प्रा. गवारे प्रा. बाबासाहेब गाडेकर, प्रा. जितेंद्र थोरात, प्रा. संदिप ठाकरे,  प्रा. दिपक मढवई, प्रा. भाऊसाहेब जाधव, प्रा. ललित घाडगे, प्रा. संतोष आहेर प्रा. संजय करंजकर, प्रा. शुभम देवकर, प्रा. अजय अदमाने, क्रिडा शिक्षक कुणाल भावसार, दिपक जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, सुराळकर, श्रावण गायकवाड, प्रा. सुवर्णा खापटे, प्रा. रचना भागवत, प्रा. अफसाना कादरी, प्रा. प्रियंका चव्हाण इत्यादींचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभत आहे.

यावेळी सुत्रसंचालन प्रा.जयश्री आहेर व प्रा.अश्विनी मोरे यांनी केले. आभार प्रा. संदिप ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News