विद्यार्थी भारतीने केला वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

मंजिरी धुरी
Sunday, 5 January 2020

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळा महाविद्यालयांत शिक्षक दिन साजरा

मुंबई - मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्री बाई फुले हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे नाव आहे. आज प्रगतीच्या क्षेत्रात अधिराज्य गाजविणाऱ्या महिलांच्या मुक्तीला जन्म देणारी आमची सावित्री माई हीच आमची खरी शिक्षिका आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या दिवशीच भारती संघटना शिक्षक दिन साजरा करत असते. त्याचबरोबर सगळीकडे याच दिवशी शिक्षक दिन साजरा करावा अशी मागणी घेऊन विद्यार्थी भारतीची राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वर्गाला सावित्री बाई फुलेंची प्रतिमा व फुल देऊन सदिच्छा दिल्या.

तसेच विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी बिर्ला महाविद्यालय, महेंदर सिंग काबाल सिंग महाविद्यालय तसेच सी. एच. एम. महाविद्यालय, कीर्ती महाविद्यालय येथील शिक्षक व मुख्याध्याकांना भेटी देत शिक्षक दिन साजरा केला.

Photos

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News