खर्डी महाविद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती संदेश प्रदर्शन संपन्न

दिव्येश जाधव (खर्डी)
Tuesday, 31 December 2019

खर्डी - जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिर मु. पो. दळखण येथे आयोजित करण्यात आले होते.

विद्यार्थीना मार्गदर्शन करण्यासाठी नशाबंदी मडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ५७ वर्षे महाराष्ट्रात व्यसनाविरोधात प्रचार, प्रसार, प्रबोधन करित आहे. मंडळाचे मुख्य ध्येय मतपरिवर्तनातून समाज निर्माण करणे, व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोड द्यावे लागते. 

दारू, तंबाखु, सिगारेट, अफु या व्यसनामुळे भारतात दररोज २५०० लोकांचा मृत्यु होत आहे. हे प्रमाण थांबवण्यासाठी आपण निर्व्यसनी व्हा आणि इतरांना निर्व्यसनी राहण्याकरता व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली व व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. 

या वेळी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डीतील राष्ट्रीय सेवा योजनाच्या ५० विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. के. डी. पवार सर, प्रा. अपर्णा जाधव, प्रा प्रियंका पवार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. आर. कळकटे व नशाबंदी मडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई उपनगरचे जिल्हा संघटक सौ. दिशा कळंबे यांनी दारू व इतर व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले तर व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिदं रूपचंद पाटील यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News