मुलगीला आरती करताना पाहून आफ्रिदीने टीव्ही फोडला - व्हिडिओ व्हायरल

यिनबझ टीम
Monday, 30 December 2019

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने संघातील हिंदू खेळाडूंविषयी भेदभाव केल्याच्या विधानामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शोएब अख्तरने एका टीव्ही कार्यक्रमात सांगितले होते की दानिश कनेरिया सोबत संघातील अन्य खेळाड जेवन जेवतानासुध्दा कचरत असायचे. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची जुनी मुलाखत आता व्हायरल होत आहे, यात पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू हिंदूत्व आणि चालीरितींचा किती द्वेष करतात, हे स्पष्ट होत आहे.

जुन्या मुलाखतीत शाहिद आफ्रिदीने सांगितले की जेव्हा त्याने आपल्या मुलीला घरी आरती करताना पाहिले तेव्हा रागाच्या भरात त्याने टीव्ही फोडला होता. मुलाखतीच्या वेळी आफ्रिदी हिंदू चालीरीतींची खिल्लीही उडवताना दिसत होता.

पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीने हिंदूंच्या आरतीची थट्टा केली असल्याचे समोर आले आहे. आफ्रिदीने मुलाखतीत सांगितले की त्याच्या पत्नीमुळेदेखील त्याने घरातला टीव्ही फोडला होता कारण त्याची पत्नी भारतीय टीव्ही चॅनलवरच्या मालिका बघत असे. यावेळी मुलेही पाहात असत.

एके दिवशी टीव्ही सीरियल पाहिल्यानंतर त्याची मुलगी हातात आरती घेऊन (हात फिरवत) आरती करताना दिसली, ज्यामुळे आफ्रिदीला इतका राग आला की त्याने सरळ भिंतीवरील टीव्ही फोडला.

आफ्रिदीच्या या वक्तव्यावर कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकजण जोरात जयजयकार करताना आणि आनंद व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जरी जुना असता तरी आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News