तामिळनाडूत शेतकऱ्याने बांधलं मोदींचे मंदिर, रोज न चुकता करतो मंत्रोच्चार आणि पठण

यिनबझ टीम
Thursday, 26 December 2019

त्रिची येथील शेतकरी पी. शंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ मंदिर बांधले आहे. 50 वर्षीय शंकर हा त्रिची जिल्ह्यातील इराकुडी गावचा रहिवासी आहे. पंतप्रधानांसाठी त्याने स्वत:च्या पैशाने मंदिर बांधले आहे.

भाजपचे स्वयंसेवक शंकर यांनी त्यांच्या लागवडीच्या जागेवर हे मंदिर बांधले आहे. दररोज सकाळी ते या मंदिरात मंत्रोच्चार करतात आणि मंत्र पठण करतात.

शंकरकडे मंदिरासाठी पुरेसे पैसे नसल्याने हे मंदिर तयार करण्यास 8 महिने लागले. मंदिराच्या आत पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या जॅकेटमधील पंतप्रधानांचा पुतळा दिसतो.

या मंदिराच्या भिंतींवर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जे जयललिता, विद्यमान सीएम पलानीसमी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही फोटो सजविण्यात आली आहेत.

हे मंदिर पाहण्यासाठी लोक दूरदूरून येत आहेत. शंकर त्यांच्या गावात शेतकरी संघटनेचे अध्यक्षही आहेत. ते म्हणतात की ते 2014 मध्येच पंतप्रधान मोदींचे मंदिर बांधण्याचा माझा विचार होता. परंतु त्यावेळी पैशाअभावी ते होऊ शकले नाही. शंकर यांनी बनवलेला पीएम मोदींची मुर्ती 2 फूट उंच आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News