महेश ज्ञानपीठ येथे आज क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन

निखिल ठाकरे, हिंगणघाट
Thursday, 26 December 2019

हिंगणघाट - महेश ज्ञानपीठ येथे आज क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन समारोह नगराध्यक्ष प्रेमजी बसंतानी, डॉ. श्री. गोपालजी मानधनिया तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडला. 

सरस्वती मातेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. तर पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवून क्रिडा महोत्सवाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

आयुष्यात प्रगती करायची असल्यास अभ्यास आणि खेळाचे संतुलन साधूनच स्वत:चा सर्वांगीण विकास साधता येतो असे मत श्री. बसंतानी यांनी मांडले.

शहराला खेळाचा वारसा लाभल्याने राजकारण असो वा समाजकारण खेळाडू वृत्ती असलेले नेहमीच या क्षेत्रात अग्रेसर राहीले आहेत, असेही त्यांनी सांगितले. डॉ. मानधनिया यांनी खेळाला प्राधान्य देणे गरजेचे असून, खेळामूळे व्यक्तीचा शारीरिकच नाही तर मानसिक विकास होतो, असे मत व्यक्त केले. 

संचालक मंडळाचे मुरली लाहोटी व संजय डालिया यांनीही खेळाला प्राधान्य देण्याचा आग्रह करून महेश ज्ञानपीठमधील शारीरिक शिक्षक मुस्तफा सर यांचे कौतुक केले. शाळेची खेळांमध्ये होत असलेल्या प्रगतीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पोळ मॅडम यांनी खेळासाठी नेहमीच सुविधा पुरविल्या जातील असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन तनू तिजारे हीने केले. तर पुर्वा खारकर हीने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी व शिक्षक वर्गाने मदत केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News