आदर्श महाविद्यालयाच्या रा. से. योजनेतर्फे संत गाडगे बाबांना स्वच्छ्ता रॅलितून अभिवादन

आदित्य मोहोड, अमरावती
Wednesday, 25 December 2019

संत गाडगेबाबा परिट (धोबी) संघटना व आदर्श महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

धामणगाव : स्थानिक धामणगाव एज्यूकेशन सोसायटीद्वारा संचालित आदर्श महाविद्यालय येथील रासेयोच्या विद्यार्थ्यांनी वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वच्छ्ता जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  

वैराग्यमुर्ती गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त दत्तक ग्राम वाढोणा भेटीनंतर हा कार्यक्रम ठरविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये विविध प्रकारच्या घोषणा आणि हातात स्वछता, पर्यावरण रक्षण, एड्स जनजागृती विषयक फलक हातात घेऊन रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांची वेशभूषा धारण करुन स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. 

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरु झालेली रॅली गजानन महाराज मंदिरमार्गे हिरापुर येथील मारोती मंदिर येथे जाऊन संपन्न झाली. त्याठिकाणी संत गाडगेबाबा परिट धोबी संघटनेतर्फे रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजुभाऊ मोहोड, उपाध्यक्ष विजुभाऊ काळे, सचिव संजूभाऊ क्षीरसागर व संपूर्ण सदस्य तसेच रा. से. योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र नागपुरे सर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी कोपुलवार मॅडम, रा. से. योजनाचे सक्रिय सदस्य उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News