खर्डी जीवनदीप महाविद्यालयामार्फत श्रमसंस्कार निवासी शिबीराचे आयोजन

दिव्येश जाधव, ठाणे
Wednesday, 25 December 2019

खर्डी - मुंबई विद्यापीठ व जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर' (दि. २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर) सुरू आहे. या कालावाधीत मु. दळखंण, ता. शहापुर, जि. ठाणे येथे आयोजित केले आहे.

या शिबिरात विविध कार्यकर्माचे आयोजन केले असून रोज नवनवीन मार्गदर्शन करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. श्रमसंस्कार शिबिरात रोज नवनवीन प्रकल्प राबण्यात येणार आहेत, तसेच शोषखड्डे, ग्राम स्वच्छता, जनजागरण मोहिम, पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम, अशाप्रकारे विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. 

या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार निवासी शिबीराचे उद्घाटक म्हूणन उपस्थित असलेले मा. नीलिमा सूर्यवंशी (तहसीलदार, शहापुर) व मा. श्री. रविंद्र घोडविंदे (अध्यक्ष जीवनदीप शै. संस्था) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मा. डॉ. नामदेव म्हसकर (प्राध्यापक, कोकण कृषी विद्यापीठ) व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आलेले मा. श्री. अरुण जाधव (प्रकल्प अधिकारी, शहापुर) मा. श्री. सुधीर पुराणिक (संचालक, रा. से. यो. मुंबई विद्यापीठ) व आदि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

श्रमसंस्कार शिबिरासाठी प्रा. के. आर. कळकटे सर, प्रा. के. डी. पवार (रा. से. यो. खर्डी महाविद्यालय), प्रा. प्रियंका पवार (रा. से. यो. अधिकारी), प्रा. अपर्णा जाधव (रा. से. यो. अधिकारी) ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News